Vetoba
Vetoba

।। वेतोबाची आरती करुया ।।

वेतोबाची आरती करुया पंचप्राणानी ।
अनन्य जाऊनि शरण मागुया आशिष प्रभुचरणी ।।धृ ।।

भाकतोद्धारण ऐसी इच्छा भूमिया मनी धरुनी ।
वेतोबाला घेऊनि येई आरवली संस्थानी ।।
भुतावळ ही चरणी दडपुनी उभी भक्तजननी ।
भव्य उंच ही मूर्ति काळी करी खड्ग अग्नी ।।१।।

भक्त संकटी असता धाऊनी सत्वर येई क्षणी ।
भक्तांच्या सौख्यास्तव फिरतो निशिदिनी हा अवनी ।।
रिद्धी-सिद्धीच्या देवा स्मरता भूते थरथरती ।
कृपा दृष्टीने यांच्या होतो रंक राव जगती ।।२।।

भक्तगृहा येऊनि याचतो क्षुधा शांत व्हावी ।
अनंत वेशे उभा राहतो कशी पारख व्हावी ?।।
स्वानगे घालुनि उडी चालवी कामे कोर्टातूनी ।
देई परीक्षा भक्ता काजे अघटित करी करणी ।।३।।

वेतोबाला सद्भावे जे पुजती भजती मनी ।
प्रसन्न होऊनि हिरे-माणके देई भक्त झणी ।।
गोड नाव तव मुखी राहु दे तन मन धन चरणी ।
जन्मोजन्मी तुझी घडो दे सेवा आंस मनी ।।४।।

<< पालखीत बैसला        आरवली ग्राम >>
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3.5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *