भीती भवाची मनी ना धरावी ।

ऊत्तुंग स्वामी शक्ती स्मरावी ।।

नयनात स्वामी मूर्ती असावी ।

कोमल हृदयात ती साठवावी ।।

मी पणाचा भ्रम सावरावा |

तुझ्या संगतीने स्वरूपी मिळावा ।।

पाहे मला स्वामी दृष्टी कृपाळु ।

ठीसुळ जरी मी, तरी तू दयाळु ।।

शीणलो दयाळा, मला सावरावे ।

आई परी मज कुशीत घ्यावे ।।

हे बोल अक्षरसुधा, योगेश्वराचे ।

स्मरता मिळे भाग्य परंपदाचे ।।

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]