Vetoba
Vetoba

।। पालखीत बैसला ।।

पालखीत बसला ग देव माझा
नटला ग हा आरवलीचा राजा
नटण्याची त्यास आवड भारी
नटली ग आज ही वेतोबाची स्वारी ।।१।।

स्वारीचा या आज नूर आगळा
नटला ग माझा वेतोबा काळा
डोईवरी शोभे हा मुकुट साजिरा
नटला ग देव माझा वेतोबा गोजिरा ।।२।।

हाती शोभे तलवार सुरेख
वाटे साऱ्यांना त्याचा हा धाक
कानी शोभती कुंडले सुरेख
दिसे साजिरे त्याचे हे रुप ।।३।।

काढू चला आता त्याची नजर
करु चला त्याच्या नामाचा गजर
पालखीत बसला ग देव माझा
वाजवू चला आता बॅड बाजा ।।४।।

पालखीला या दिला मी खांदा
भक्त हे वाजविती झानजा
टाळ मृदूंगाचा चालला गजर
दुमदुमले हे आरवली ग्राम ।।५।।

पालखीत बसला ग देव माझा
नटला ग माझा वेतोबा काळा
डोईवरी शोभे हा मुकुट साजिरा
नटला ग देव माझा वेतोबा गोजिरा ।।६।।

<< आरवली आहे माझी        वेतोबाची आरती करूया >>
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3.5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *