Vetoba
Vetoba

।। आरवली ग्राम ।।

आरवली ग्राम । वेतोबाचे धाम ।।
भक्तांचे विश्राम । वसतसे … ।।१।।

मूर्ति उंच काळी । सुंदरसे भाळी ।।
खड्ग अग्नी कर । शोभतसे … ।।२।।

सुंदर ते ध्यान । पाहता तत् क्षण ।।
वेडावले मन । नाचू लागे … ।।३।।

अंगाची ते कांती । कोण वर्णू दीप्ती ।।
कोटी चंद्र ज्योती । नेत्री वसे … ।।४।।

भूमियाने तुज । इथे आणियेले ।।
भक्त उध्दरण्या । सिद्ध केले … ।।५।।

वेतोबाचे ध्यान । जडो तेथे मन ।।
तनुधन प्राण । तुझे पायी … ।।६।।

मागणे ते लयी । आणी नाही काही ।।
पद दास्य देई । तेणे तोष … ।।७।।

<< वेतोबाची आरती करूया        दाता वेतोबा देवा शरणं >>
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *