
।। माझी वेतोबा माऊली ।।
माझी वेतोबा माऊली, उभी आरवली ग्रामी
संगे भूमिया पूर्वस, आणि माऊली सातेरी
येई सिद्धेश्वर सवे भक्त उध्दरण्या राही ।।१।।
फिरे अवनीवरती, वार्ता सर्वहि ठेविती
चिंता भक्तांची वाहती,मार्ग तया दाविती
ऐसी कारुण्याची मूर्ति, माझी वेतोबा माऊली ।।२।।
कधी रुसतो कधीही फुगतो कधी रागे भरतो
लाडही तसेच करितो आणि भक्तां सांभाळितो
ऐसी प्रेमाची ती मूर्ति, माझी वेतोबा माऊली ।।३।।
माय बाप तूंचि माझा, गुरु बंधू आणि सखा
पडितो रे तवपायां, राजनला हाती धरा
तव कृपा आता ओपी, माझी वेतोबा माऊली ।।४।।
<< दाता वेतोबा देवा शरणं मोहक सुंदर आरती >>
Click to rate this post!
[Total: 4 Average: 4.3]