Vetoba
Vetoba

।। मोहक सुंदर ।।

मोहक सुंदर मूर्ती मनोहर, जणू चैतन्याची ।
सद्भावे मी आरती करितो, श्रीवेतोबाची ।।धृ ।।

मूर्ति जणु ही मजला गमते, प्रेमळ कृष्णाची ।
कधी गमे ती काजळ काळी,पंढरीनाथाची ।
कधी शिवाची कधि विष्णुची, कधी ती भाऊंची । जय जय ।।१।।

गुरुरायाची माया जणु का मोहरुनि फुलली ।
पुंडलीकाच्या विठूरायासम भेटीस कां आली ।
आरवलीची माय माऊली, सुरभि भक्तांची । जय जय ।।२।।

अमल प्रीतीने, गोपीसम जो पाहिल मूर्तिस ।
अनन्य भावे शरण जाऊनि, होईल जो दास ।
तो देवाचा, देव तयाचा प्रचिती ध्यासाची । जय जय ।।३।।

<< माझी वेतोबा माऊली        देव माझा किती देखणा >>
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

1 thought on “मोहक सुंदर आरती”

  1. श्री वेतोबाची गाणी कवन सुमने ऐकुन फारच आनंद झाला. फारच छान आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *