
।। देव माझा किती देखणा ।।
देव माझा किती देखणा
ओठ गुलाबी छान
आरवलीवर उभे हे
सुंदर काळे ध्यान ।
गुलाबाच्या या जणू पाकळ्या
ओठ हे सुंदर छान
रुप त्याचे किती देखणे
हरपले माझे भान ।
हात त्याचे किती मुलायम
बोटे ही सुंदर छान
स्पर्श त्याचा किती मुलायम
मोरपीस जणू छान ।
भव्य दिव्य हे कपाळ त्याचे
रुप हे दैदिप्यमान
भाळी शोभे सुंदर टिळा
पाहूनी हरपले भान ।
डोळ्यांचे या काय करु वर्णन
त्यात सामावले सारे त्रिभुवन
डोळ्यांच्या या दोन ज्योती
जणू चंद्र सूर्य तळपती ।
धारदार ही सुंदर नासिक
लुटे भक्तिच्या सुगंध
नासिका ही जणू चाफेकळि
देई मना आनंद ।
पाऊले त्याची किती मुलायम
मखमालिहूनी मऊ हसतील जाण
सुख लाभे पायी त्याच्या
अर्पीले मी तन मन धन ।
<< मोहक सुंदर आरती वेतोबाचे नामस्मरा >>
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]