ॐनमो भगवते वासुदेवाय
॥ श्री श्र्लोकबद्ध भावार्थ भगवद्गीता ॥

नमो ॐ गणेशा, नमो आदिमाता
नमो ज्ञान देवा, नमो विश्र्वत्राता
धृतासी करी संजय क्षेत्र वर्णा
जिथें लक्षितो अर्जुना कौर सेना ॥१॥

सगोत्रें उभीं मारण्या पाहुनी हीं
वदे पार्थ कीं, “वैभवें जाळवा ही”
वदे कृष्ण, “आत्मा नसे नाशिवंत
निमित्तें तुझ्या मारितारी अनंत” ॥२॥

वसे पंचभूदेहि अंशात्म आत्मा
पडे जीव मायेमुळें संभ्रमाया
तरी ऱ्हास धर्मास, हो त्रास संता
तयां तारण्या जन्म घेई विधाता ॥३॥

जरी पींडीं ब्रह्मांडिं तूं व्यापलासी
पुसे पार्थ काँग्रेस, “योनि फेरें जिवासी”
अरे जे मला सर्व व्यापी पहाती
तया योनि चक्रांतुनी टाळतों मी ॥४॥

खरा भक्त जो षड् विकारास जाळी
हरी नाम घेई सदा सर्व काळी
मिळे जे तयां ईश्र्वरा अर्पियेतो
असा भक्त माझ्या स्वरुपांत येतो ॥५॥

कसे स्थैर्य देवा मनाला अणावें
अरे मोह-मायेंत ना सांपडावें
करी योग-कर्में तया मी दिसेन
मुखीं नाम संसारिं घेई दिसेन ॥६॥

जरी खेळवी सृष्टी माया-भ्रमांत
करी सूत्र माझ्या नि, मी ना कशांत
दिला जन्म हा मानवी उद्धरावें
मुखीं नाम संसारिं घेई दिसेन ॥७॥

जिवीं ना कधीं, नाम घेतील अंती
खुला नर्क त्यांना मला नोळखीती
असे वास माझाहि भक्ता ठिकाणीं
तयाचा असे दास मी चक्रपाणी ॥८॥

जगीं व्यापलो मी अदी-मध्य-अंती
अरे मद् विना वस्तु ना जन्म घेती
मनीं इच्छिता जन्म-संहार होती
तुम्ही आदि-मायेस या नोळखीती ॥९॥

कसे विश्र्व व्यापून राही अलीप्त
करा स्पष्ट नी अज्ञ-अंधा प्रदीप्त
फिकी वर्णितां वेद, शास्त्रें, पुराणें
दिसे ब्रह्म त्या खुंटते बोलणें हे ॥१०॥

वदे कृष्ण पार्था, “पहा विश्र्वरूप”
त्रिखंडी दिसे, दीव्य-भव्य-कुरूप
रचीले कसें विश्र्व वा कार्य चाले
दिठी पार्थ पाहून संतुष्ट झाले ॥११॥

स्मरे, गेहीं, दारीं, वनीं, तिन्ही काळीं
तसे चालतां-बोलतां अंतःकाळीं,
कृती-कार्य वा भोग कृष्णार्पण
करी भक्त ऐसा मला पंचप्राण ॥१२॥

करी देह ही बाहुली आदि-माया
तिनें इच्छिता चालते सर्व काया
परी सूत्रधारी नि मी ना कशांत
असा देह चाले, न शंकू मनांत ॥१३॥

तुझ्या पासुनी जीव हे जन्म घेती
तरी पाप नी पूण्य कां भोगिताती?
त्रिगूणात्मयीं गूण जे संचरीती
जसे श्रेष्ठ अंगी, तसे जन्म घेती ॥१४॥

पदार्थां मध्यें तेज ते आत्मतत्व
क्षरा अक्षरांतींत हे ब्रह्मतत्व
जया बोलती वेद पुरुषोत्तम
स्थितप्रज्ञ हे जाणि सर्वोत्तम ॥१५॥॥

अभेदा, अभिन्ना, अच्छिन्ना, अवर्णा
असा संचरे जीव देहांत नाना
अरे जन्म वा मृत्यु ही एक भ्रांती
स्मरोनी करा कर्म-त्यागास प्रीती ॥१६॥

असे तामसी, राजसी, सत्वगूणी
भुलोकीं असे नांदती जे भवार्णी
असे राजसा, सात्विका, स्वर्गलोक
परी न्याय त्या तामसा नर्क-लोक ॥१७॥

तुला बोललों अर्जुना ब्रह्म गूह्य
जगीं आचरीती मला तेंच प्रीय
जरी गीत हे वाचती नित्य नेमें
तयांची फलें सर्व इच्छीत कामें ॥१८॥

ॐतत् सत इति ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *