Sangeet Sawali

येई गे ये गंगे अंगणी

येई गे ये गंगे अंगणी
या बाळांना दर्शन द्यावे, हीच तुला विनवणी ।।धृ ।।

जानकीची ही विनंती ऐकुन
गंगा आली क्षणांत धावून
रस्त्यावरती भरले जीवन,
अघटित ही करणी ।।१।।
म्हणे मुलांना घ्यावे दर्शन
गंगा आली तुमचे कारण
स्पर्श करा हे शीतल जीवन
सन्मुख जावोनी ।।२।।
स्पर्श करोनी व्हावे पावन
शिरीं शिंपडा पवित्र जीवन
सहज येति रे, भाग्याचे क्षण,
सन्मुख चालोनी ।।३।।
गंगेला या घरांत घेऊ
देव खोलीच्या भूमित ठेवू
ठाव तिला बघ अखंड देवू,
जगदंबा चरणी ।।४।।

Click to rate this post!
[Total: 1 Average: 2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *