Sangeet Sawali

उभी जानकी ओट्यावरती

उभी जानकी ओट्यावरती, मुले तिच्या भोवती
श्रावण धारा सवे पाहती, विजांच्या गमती ।।धृ ।।

नील नभाच्या तमपटलावर, नक्षी कोण रेखी
क्षणांक्षणांला नविन आकृति, कुणी नसे सारखी
कधी भयानक, सुखद कधी ती, प्रसन्न कधी चित्ती ।।१।।

ऐसी पाहुनी या विजांची, चंचल चपल गती
प्रश्न मुलांनी आजीस केला, ज्यांची मंद मती
क्षणभर कां नच वीज थांबते, नभांत कां विरती ।।२।।

तोंच आजीने हात उचलीला, वीज रोखण्यास
वीज थांबली जिथे प्रकटली, तिथल्या जागेस
अशक्य कैसे शक्य जाहले, स्तिमित झाली मती ।।३।।

नसे जानकी अन्य न कोणी, होती शिवशक्ती
अज्ञानाच्या तिमिर पटावर, हीच दीव्य ज्योती
वंदन करुनि, आशीष घ्यावा, हीच कृपामूर्ति ।।४।।

Click to rate this post!
[Total: 3 Average: 3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *