तुमचे जीवन
तुमचे जीवन करण्या पावन, नित्य स्मरा अंतरी
कलियुगी- “जानकी दुर्गेश्र्वरी” ।।धृ।।
हिला न कसली आशा पाशा
परी कधी ना करिल निराशा
दुःख निवारिल, पुरवुनि आशा
हीच “कालिका” खरी ।।१।।
अज्ञानाचा तिमिर घालवुनी
सन्मार्गाकडे तुम्हा वळवुनी
ज्ञानामृत देईल पाजुनी,
ग्रंथ विणाधारी ।।२।।
सुख शांतिचे वैभव देईल
कल्पतरू तळी तुम्हा बैसविल
जीवन आरोग्यासह फुलविल
लक्ष्मी सुखकारी ।।३।।
जो जो वाचील तिची “सावली”
त्याची संगत कधी न सोडली
जन्मोजन्मी सोबत केली
जानकी सर्वेश्र्वरी ।।४।।
Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]