Sangeet Sawali

श्री गणराया

श्री गणराया वंदन करितो, पदकमले स्पर्शून
तुझ्या कृपेने “संगीत सावली” – देवा घे लिहून ।।धृ ।।

जानकीचे घरी स्वये येऊनि, आमंत्रण दिधले
तिचे थोरपण तुम्ही देवांनी, मान्य असे केले
तिची सुकीर्ति गाण्या मजला, द्यावे वरदान ।।१।।

प्रेमभक्तीची शिकवण देऊन, ज्ञानामृत पाजिले
दुःखी जनांना अभय देउनी, जीवन मोहरले
म्हणुनी जानकी दुर्गेश्र्वरीचे, गाण्या गुण-गान ।।२।।

जो जो गाईल जानकी गीता, धरूनि तिचे ध्यान
मन वांच्छित ते लाभुन त्याचे, होईल कल्याण
म्हणुनि गणेशा मजला करणे, “गुरु आज्ञा पालन” ।।३।।

Click to rate this post!
[Total: 14 Average: 4.5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *