Sangeet Sawali

श्री चित्र्यांचे घरी

श्री चित्र्यांचे घरी जन्मली, एक चिमुरडी राणी
ऐका ऐका सुजन सांगतो, तिची अमर कहाणी ।।धृ ।।

कन्या येता समाज वदतो, घरात लक्ष्मी आली
मात पित्यांना वैभव देईल, संसारात दिवाळी
पाळण्यांत मग नाव ठेविले, लाडकी दूर्गा राणी
परी दैवाने तिच्या नशिबी, लिहीली एक विराणी ।।१।।

स्वये जन्मता पहा कशी ती, आई सोडून गेली
तातही तैसे लवकर गेले, पूर्ण अभागी झालीं
जो तो बोले तिला पाहूनी, कशी वैरिणी आली
लाड न करिता कोणी मंडळी, झाली केविलवाणी ।।२।।

आजोबाने तिला पोसली, भरभर मोठी झाली
दारिद्र्याने परी घेरले, अन्न वस्त्र ना ल्याली
कोसावरल्या नदीमधून ती, वाहून आणी पाणी
पाय भाजती तरिही आणते, धुणीभांडी घासोनी ।।३।।

कशी पोरकी मुले राहती, अपमानीत जगतात
दूर्गा त्यांचे जीवन बघण्या, आली संसारात
कुणा न कळले कशी जाहली, अघटित ही करणी
स्वये अंबिका तिच्या रूपाने, आली या धरणी ।।४।।

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4.3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *