Sangeet Sawali

नवरात्रीच्या गरब्यामधुनी

नवरात्रीच्या गरब्यामधुनी, फेर धरिती भगिनी
जानकी गाई सूस्वर गाणी ।।धृ ।।

वेंगणीयाच्या नदि तिरावर
महादेवाचे असे मंदिर
गरबा चाले तिथेच सुंदर
नवरात्रिचे दिनी ।।१।।

सान थोर ही मंडळी जमली
या गरब्याला रंगत आली
मध्ये जानकी स्वये चालली
फेर धरुनि रिंगणी ।।२।।

दादांचा एक मित्र वदला
काय रात्रीचे घरांत निजला
चला पाहावे रूपवतीला
तुमची अर्धांगिनी ।।३।।

तसेच दादा तिथे धांवती
जानकीला गाताना बघती
कोण घरामधे निजली होती
वंदन करिती मनी ।।४।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *