Sangeet Sawali

कोणी येता सुवासिनी घरी

कोणी येता सुवासिनी घरी, जानकी त्यांची ओटी भरी
विन्मुख कोणा कधी न पाठवी, श्रीफल दे पदरी ।।धृ।।

कोनाड्यातील नारळ पडला, दादांचे नजरी
उगाच अडचण नको म्हणुनिया, केला त्यांनी दुरी
क्षणात दुसरा प्रकट होतसे, तेथिल जागेवरी ।।१।।

तोही काढून ठेवित खाली, चिडलेल्या नजरी
वळुनी पाहता तिथेच दिसला, तिसरा जागेवरी
असे काढता खाली जमले, एक हजारावरी ।।२।।

जितुके दैवत तितुके श्रीफल, असतील जागेवरी
गणना त्यांची मला न माहित, फिरती जगतावरी
अज्ञानाने चुकलो म्हणुनि, दादा चरण धरी ।।३।।

Click to rate this post!
[Total: 1 Average: 3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *