Sangeet Sawali

कोण आम्हाला म्हणतो रे चोर

समोर यावे कोण आम्हाला, म्हणतो रे चोर
लाज न वाटे, आळ घ्यावया, आम्हा गरिबांवर ।।धृ ।।

गरिबी म्हणुनि, काय कुणीही, लावावे बोल
अपमानित त्या करुनि कपाळी, कलंक लावेल
घेऊनि आलो त्यासाठी, तळपती तलवार ।।१।।

रुद्ररूप पाहून पतिचे, जानकी घाबरली
अनर्थ होईक लग्नमंडपी, सन्मुख ती आली
थांबा, थांबा, घालविते मी, त्यांचा अहंकार ।।२।।

सालंकृत ती उभी राहिली, मुकूट शिरावर्ती
शालू, पैठणी, हिरे, माणके सुवर्णमय कांती
भयकंपित बघणारे झाले, होई गर्वहार ।।३।।

गरिबी म्हणुनि कुणा न हिणवा, ठेवा ही जागृति
प्रत्येकाची आपआपली, असते दैव गती
जसे ठेविले, तसेच जगणे, करण्या सिंधू पार ।।४।।

Click to rate this post!
[Total: 1 Average: 3]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *