Sangeet Sawali

कशाला काळजी

कशाला काळजी अन चिंता,
जानकी नित जवळी असता ।।धृ ।।

जरा प्रीतिने तिज आळविता
धांवत येईल जानकी माता
तुमची सारी वाहिल चिंता
हीच जगन्माता…. ।।१।।

नको मानांतरी ठेवुस किंतू
उगाच शंका आणि परंतू
दृढ भावासह निश्र्चल हेतु
ठेवी पदी माथा…… ।।२।।

विश्र्वासाने शिर टेकिता
कुरवाळिल तुज जानकी माता
भवभय मुक्ति हरुनि आपदा
देईल सुखसंपदा…… ।।३।।

Click to rate this post!
[Total: 8 Average: 4.8]

6 thoughts on “कशाला काळजी”

  1. खूप छान खूप चांगला वापर केला आहे आपण ह्या सोशल मीडियाचा. बरेच जण सोशल मीडिया वर असतात . निदान ट्रेन मधून येता जाता श्री जानकी आई चे भजन आणि पोथी ऐकु आणि वाचु शकतील.
    आपण नेहमीच जानकी भक्तां साठी काही ना काही करता . मला फार मनापासून वाटत की जशी बाळू माम ची सिरीयल आहे तशी आपल्या जानकी आई ची पण माहिती सर्वान पर्यंत पोचवावी . पण ह्यात कुणाला दुःख वाहायचा हेतू नसावा.
    कृपया ह्याचा नक्की विचार करावा . लोकांना आलेले अनुभव पण ह्यात असावे .
    ‘जय जानकी दुर्गेशेरी’ ???

  2. आपल्या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. टीव्ही सिरीयल काढण्याबद्दल प्रस्ताव आला होता.गुजरातची सिरीयल चे दिग्दर्शक श्री राजशेखर उपाध्याय यांनी तीन चार एपिसोड लिहिले पण आहेत. परंतु आम्हाला सहकार्य न मिळाल्यामुळे ते तसेच पडून आहे. जानकी आईची इच्छा असल्यास योग्यवेळी ते कार्य पूर्ण होईल असा विश्वास वाटतो. सावली च्या अनुभवांवर कॉम्पिटिशन ठेवली होती त्याची पुस्तिका सावली सौरभ नावाने प्रसिद्ध झाली आहे ती पण येथे देण्याचा प्रयत्न करीत आहोत. असेच आम्हाला प्रोत्साहन देत रहा
    राजन सुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *