Sangeet Sawali

दुर्दैवाची कुऱ्हाड कैशी

दुर्दैवाची कुऱ्हाड कैशी, नशिबावर बसली
जानकी तूच आता रखवाली ।।धृ ।।

कळे न कैसे बाळ जन्मले
जन्मताच ते विद्रूप झाले
लुळे पांगळे जीवन सगळे
घेऊन जी आली ।।१।।

तूच आमुचे जीवन सगळे
या बाळाला करी चांगले
गत जन्माचे पाप लागले
भोगु कसे, माउली? ।।२।।

धावून आली जानकी माता
त्वरित घेऊनि बाळ अंकिता
प्रेम भक्तिची एकच फलिता
सुदृढता दिधली ।।३।।

दृढ भक्तिचा अगाध महिमा जानकी
जय जानकी दुर्गेश्र्वरी

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *