Sangeet Sawali

धांव पाव जानकी आई

धांव पाव जानकी आई, कुठे गुंतलीस
तुला कां न ऐकू येते, माझी हांक आर्त ।।धृ ।।

पहा बाळा अंगी भरला, ताप फणफणून
तसे फोड त्याच्या आले, अंगी टरटरुन
म्हणुनि आठवीते तुजला, धांव घे घरांत ।।१।।

वंशदीप एक माझ्या, कुशित तू दिलास
परी ज्योत त्याची कैशी, लागली पणास
तुझ्या सावलीवरती आहे, आमुची सर्व भीस्त ।।२।।

नको अंत पाहू माझा, नको जीव घेऊ
कळेना मला गे, कुठे शोध घेऊ
सुरक्षित त्याला ठेवि, तुझ्या अभय करांत ।।३।।

तिची आर्त ऐकून हांक, प्रकटली घरांत
आई गणदेविची ती, आली नवसारींत
प्रेम भक्ती श्रद्धा, पुरवी सर्व मनोरथ ।।४।।

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *