Sangeet Sawali

चावू नका भुंग्यांनो

चावू नका भुंग्यांनो, या गरिब ब्राह्मणाला
दार मंदिराचे तो देतो, उघडूनि आम्हाला ।।धृ ।।

शरण येऊनि जो का ऐसे, राग आवरील
दया क्षमा त्याला करणे, हेच खरे शील

जाण होता अपराधाची, दोष मुक्त झाला ।।१।।
सर्व भक्त जानकी संगे, जाती मंदिरात
भेट माऊलीची होता, ते मनोमनी तृप्त

उदारपूर्ति करुनी सगळे, निघती परतण्याला ।।२।।
तोंच अर्ध्या वाटे वरती, व्याघ्र ये समोर
गर्भगळीत बघता झाले, मृत्युला समोर

परी जानकी गोड बोलुनी परतवी तयाला ।।३।।
घशामध्ये पडता कोरड, एक सुकन्या आली

पाणी पाजुनी गेली त्यांना, तीच भद्रकाली
संत संगती आणून देते, भाग्य सुभक्ताला ।।४।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *