Sangeet Sawali

चैत्र शुद्ध नवमीला

चैत्र शुद्ध नवमीला केली, जीवन यात्रा पुरी,
जानकी चालली स्वर्गांतरी ।।धृ ।।

वायू वेगे वार्ता गेली
स्वर्गामध्ये पहा पसरली
देव देवता सज्ज जाहली
उभ्या स्वर्ग द्वारी ।।१।।

गणगंधर्वही धावत आले
योगिनी, नारद, तुंबर आले
उजळुनि आरति सज्ज जाहले
तबके त्यांचे करी ।।२।।

माध्यांनीच्या समयी आला
प्रभु रामाचा रथ धरतिला
सुवर्ण कांतिने जो सजला
जानकीचे द्वारी ।।३।।

जानकी जाई प्रभु सांगाती
ऐरावत हत्ती, तिचे स्वागती
देव देवता करिती आरती
इन्द्रही वंदन करी ।।४।।

जगदंबेच्या सन्मुख जाता
तेजामध्ये ज्योतही मिळता
अभेद्य झाली जानकी माता
जगदंब अंतरी ।।५।।

Click to rate this post!
[Total: 2 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *