Sangeet Sawali

।। आरती ।।

जय जानकी दुर्गेश्र्वरी
तुझी आरती करिता भरतो ब्रम्हानंद ऊरी ।।धृ ।।
गणदेवीला प्रकट जाहली
भक्तजनांची तू रखवाली
संकट समयी दिली सावली
होऊनि कैवारी….. ।।१।।
सुख दुःखाच्या या संसारी
आशीष गमला ब्रज्य पंजरी
निराधार ना कुणिही अंतरी
कृपा छत्रधारी….. ।।२।।
तुच आमुची माय माउली
झांकुन घेशी पदराखाली
दमन दूर्जना पायाखाली
रौद्ररूपधारी….. ।।३।।
अमृत भरले तुझ्या कीर्तनी
सुखमय होईल अवघी अवनी
मागितले जे “पसायदानी”
देशील करुणेश्र्वरी ।।४।।
नाम असावे तुझे वैखरी
विसर न व्हावा या संसारी
वास करावा हृदय मंदिरी
विश्र्वरुप सुंदरी ।।५।।

Click to rate this post!
[Total: 9 Average: 3.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *