श्री वसंत कुमार तावडे तथा परमपूज्य श्री अवधूतानंद महाराज यांच्या अध्यात्मिक व सार्वजनिक कार्याला सहाय्यभूत असे संघटित व सामाजिक स्वरूप देण्याच्या उद्देशाने श्री अवधूतानंद महाराज भक्त मंडळ ट्रस्ट मुंबई ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
हे मंडळ अस्तित्वात आल्यापासून अल्पावधीतच महाराजांचे जन्मदाते, परमपूज्य श्री समर्थ साटम महाराज यांचे ओवीबद्ध चरित्र प्रकाशित करण्याचे भाग्य लाभले याचा मंडळाला आनंद होत आहे.
हा चरित्रग्रंथ दोन्ही महाराजांचे परमभक्त श्री मधुकर गजानन सुळे उर्फ भाऊदास यांनी परम गुरुभक्तीनें, आदराने व प्रेमाने केला असून तो श्री अवधूतानंद महाराजांना अर्पण केला आहे तथापि त्याच्या प्रकाशनाचे सर्व हक्क मंडळाला देऊन त्यांनी मंडळाला उपकृत केले आहे.
या ग्रंथाची शुद्ध प्रत करण्यात श्री रविंद्र वि. दांडेकर यांचे मोलाचे सहकार्य ‘मंडळाला’ झाले असून ‘मंडळ’ त्यांचे ऋणी आहे.
या ग्रंथातील छायाचित्रे व रेखाचित्रे महाराजांचे एक भक्त सिद्धहस्त कलाकार
श्री.के. मालवणकर यांची आहेत. मंडळ त्यांचे ऋणी आहे.
तसेच ह्या ग्रंथाचे फोटोटाईप सेटिंग चे काम मे.सॅम टाईपसेटर, केशरबाग नायगांव, दादर यांनी करून दिले आहे. त्याच प्रमाणे या ग्रंथाची छपाई मे.बिंदू आर्ट यांनी सुबकपणे करून दिली आहे त्याबद्दल मंडळ त्यांचे आभारी.
या ग्रंथाच्या प्रथम आवृत्तीचे प्रकाशन महाशिवरात्रीला करून मंडळ श्री अवधूतानंद महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करीत आहे.
श्री अवधूतानंद महाराज भक्त मंडळ ट्रस्ट मुंबई
माघ वद्य चतुर्दशी शके 1915 दिनांक 10 मार्च 1994