(१)

मंगल मूर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया ॥ तूं सद्गुरु राया। दाणोलीच्या संता ॥धृ॥       

तूं सुखकर्ता तूं दुखहर्ता । विघ्न विनाशक तूं गणराया। 

दाणोलीच्या संता ।। १ ॥ मंगल…. 

कोटी कोटी अपराध या । पोटी घालिसी तूं गणराया। 

भाव मनी हा तुझा धरुनिया । आलो तुझ्या पाया।

दाणोलीच्या संता ।।२।। मंगल….

अनंत रूपें लेवूनी संता । अनंत झाला तूं या जगतां । 

अनंत कोटी दुःखी जनांचा । तूंच एक त्राता ।।

दाणोलीच्या संता ।। ३ ॥ मंगल …. 

(२)

जय जय दत्तराज योगी । जय जय गुरुराज योगी। 

दाणोलीचे संत साटम तुम्ही ।॥धृ ॥ जय… 

या कलीयुगामाजी। गांजलो बहू हो आजी। 

आम्हां तारण्यां तुम्ही प्रगटला । दाणोली नगरीं । ।१ ।। जय …

कुणी न आम्हां जगती वाली । महती तुमची कानी आली ॥ 

दिनानाथ म्हणोनी धावलों। दाणोली नगरी ।।२।। जय …


Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]