गायीला का मान देती देवा समान
तिचे दूध बालकांना अमृत पान ॥धृ॥

काय काय करतात दूधा पासून
सांगतो मी ऐका तुम्ही लक्ष देऊन ॥१॥

दूध तापविता येते वरती सायी
विरजण लाविता की होतसे दही ॥२॥

दही घुसळता होते मधूर ताक
त्याचे माजी डोकावते लोण्याचे मुख ॥३॥

लोणी कढविता होते साजुक तूप
जीवनाची सत्वें त्यांत असती खूप ॥४॥

दूध आटविता होतो खमंग मावा
त्याचा बने पुढे, बर्फी, मिठाई मेवा ॥५॥

दूध आटविता होते बासुंदि छान
श्रीखंडही करतात दह्या पासून ॥६॥

दहीं, दूध, तूप,लोणी, रोज तुम्ही खा
शरिरानें धष्टपुष्ट बालकांनो व्हा ॥७॥

ऐसे जीचे दूध देई नवजीवन
वंदनीय कामधेनु देवासमान ॥८॥

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *