आला आला फुगेवाला फुगे घेऊन
फुगे घेण्या सारी मुलें आली धांवुन ॥धृ॥

रंग आकाराची विविधता आणून
मुलांची हा मनें घेतो पहा ओढून ॥१॥

कांठी भोवतील फुगे वाटे पाहून
फुग्यांचेच झाड जणू आला घेऊन ॥२॥

हवा भरतानां काहीं गोल फुगती
कांही लांब पडवळापरि भासती ॥३॥

कांहीं दूधी काकडीच्या परि दिसती
फुग्यांचेही खेळ मजेदार करिती ॥४॥

पिपाणी वा पुंगी पहा मुखें वाजवी
खुळखुळा वाजवुनी मुलें जमवी ॥५॥

पशु पक्षि, चक्र, फुलें बनवी किती?
प्रश्र्न मना पडे वस्तू घ्यावी कोणती? ॥६॥

कुणी वायु भरुनिया ऊंच सोडीती
फुग्याचे पतंग जणू नभी ऊडती ॥७॥

फुग्याचे तोरण जन्मोत्सवी बांधती
ऐसी या फुग्याची आहे सारी महती ॥८॥

ऐसा सान-थोरांनाही आवडे फुगा
म्हणुनि मुलांना फुगा वाटतो हवा ॥९॥

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *