इसाप सांगे कथा मुलांना, मनोरंजनाच्या
चातुर्याच्या,धूर्तपणाच्या, विशाल बुध्दिच्या ॥धृ॥

सुखमय होईल जीवन कैसे, हीत अहित काय?
हेंच सांगण्या इसाप घली, कथामृत पोय. ॥१॥

इथे बोलती मूक प्राणिजन, मानव वाणींतुन
शिकवण देती सहज मुलांना, गोष्टींतुन ज्ञान. ॥२॥

अज्ञानांतुन सज्ञानाचा, निर्मळ प्रेमाचा
कथना मधुनी मार्ग दाखवी, निव्वळ सत्याचा. ॥३॥

याच कथांना साज देऊनच, नव्या कल्पनांचा
प्रस्तुत करितो पुनःश्च आम्ही, ठेवा आनंदाचा ॥४॥

Click to rate this post!
[Total: 3 Average: 4.7]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *