आईने आणली मला एक बाहुली
किल्ली देतां घरभर पळू लागली ॥धृ॥

तिला बघण्याला साऱ्या जमल्या मुली
तिचेही कौतुक सारी करू लागली ॥१॥

तिच्या मागे पळताना मीही दमली
भिंती च्या समोर छकुलीच अडली ॥२॥

पळतां पळतां तिला भूक लागली
म्हणुनी सोनुली माझी रडू लागली ॥३॥

उचलुनि कडेवर तिला घेतली
मला तीं पाहुनी मनांमध्यें हसली ॥४॥

पकडूनि पायावर तिला घातली
चमच्यानें दूध तिल राजू लागली ॥५॥

छकुली सोनुली माझी गोड हसली
पुन्हा वेडी घरभर रांगु लागली ॥६॥

भारीच खट्याळ आहे माझी सोनुली
सगळी खेळणी तिनें माझी मोडली ॥७॥

तिच्यावर माझी आई खूप चिडली
कपाटांत बंद करुनिया ठेविली ॥८॥

जेंव्हा जेंव्हा आठवते मला छकुली
तिची मी लांबून गोड पपू घेतली ॥९॥

Click to rate this post!
[Total: 3 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *