आम्ही इवली इवली मुले
आम्ही हसतां , तुम्ही वाटे, कीं हीं फुलली फुलें ॥धृ॥

फुलां मधिल हा शुभ्र मोगरा
त्याचा बनतो सुंदर गजरा
बघणाऱ्यांच्या वळती नजरा
अशी मुले ही फुलें ॥१॥

पिवळी पिवळी ही शेवंती
तेज रवीचे घेई कांती
रमणी करिती तिजवर प्रीति
सुंदर दिसल्या मुळे ॥२॥

गुलाब अमुचा सदा हांसरा
सुगंध पसरी सर्व परिसरां
सर्व सुखांना इथे आसरा
फुला मुलांच्या सवे ॥३॥

जेंव्हा आम्ही गातो गाणी
पडे चांदणे तुमच्या जीवनी
तुम्हास देतो सौख्य पर्वणी
अमुच्या हसण्या मुळे ॥४॥

Click to rate this post!
[Total: 4 Average: 4.8]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *