
।। आरवली आहे माझी ।।
आरवली आहे माझी । दुसरी पंढरी
उभे देव वेतोबा हे । विठ्ठलाचे परी ।।धृ ।।
प्रेम जणु त्यांचे वाहे । चंद्रभागे परी
भावे करिती जे स्नान । तयासी उद्धरी ।।१।।
नामाचा गजर चाले । झान्ज टाळावरी
भक्तां सह नाचु लागे । वेतोबाची स्वारी ।।२।।
रुप सावळे बघावे । एकदा संसारी
लोचनी भरावी मुर्ती । स्मरावी अंतरी ।।३।।
भक्त रक्षण्या धरिला । खङग अग्नी करी
नसे तयांचे दासाला । जगी कणी वैरी ।।४।।
माय बाप नित्य करी । कृपा दासांवरी
अपराध बालकांचे । घेईल पदरी ।।५।।
अवतरे दुजे आता । वैकुंठ भूवरी
आरवली म्हणोनी । करावीच वारी ।।६।।
<< उठा उठा हो श्री वेतोबा पालखीत बैसला >>
Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]