
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
माझी सर्व प्रथम ओळख श्री मधुकर सुळे ह्यांची माझ्या काकांकडे (श्री गजानन चौबळ) शारदाश्रमांत (दादर) येथे झाली. तेव्हापासून मी त्यांचा झालो ते आजतागायत आणि कायमच रहाणार. त्यानंतर माझ लग्न त्यांची भाची रंजनाबरोबर झाल आणि संबंध अधिक दृढ झाले. मी त्यांच्यामुळेच प. पु. भाऊकाकांकडे जावयास लागलो आणि काकीशी ओळख झाली. “विसावा” आणि “सावली” मुळे मी भाऊकाका आणि जानकी आईशी निगडीत झालो. आमचा संसार आम्ही त्यांच्याच चरणी अर्पण केला आहे.
प.पू. जानकीआईविषयी बोलण्याचा सांगण्याचा आम्हाला काहिच अधिकार नाही पण मी अल्पसा प्रयत्न करतो. काहि चुकल्यास आई सांभाळून घेईलच. आम्ही आमच्या घरांत शिरल्याबरोबर जानकी आईच दर्शन होईल असाच आईचा फोटो ठेवला आहे. कुठेहि जाताना येताना आईला सांगूनच जातो व आमची रक्षा करा व आमच्याबरोबर असा अशी प्रार्थना करतो. त्यामुळे आई आमच्या बरोबर आहे हि भावनाच असते.
मी प.प. मधुमामांनी लिहिलेल्या विसावा आणि सावली याचा रोज एक अध्याय, एक पुस्तक पुर्ण झाल्यावर दुसर याप्रमाणे वाचतो. (शक्यतो त्याच्याच कृपेने नेम चुकत नाही).
मला लहानपणी दादरच्या (हिंदूकॉलनी) आमच्या घरांतील जिन्यातून वर जाताना भयंकर भिती वाटली होती म्हणजे मी ओरडतच जिना वर चढत गेलो. त्यापासून मला एकट्याला कुठेहि रहाण्यास फारच भिती वाटत होती. पण प.पू. भाऊकाका आणि जानकी आईच्या नामस्मरणाने तसच विसावा व सावलीच्या वाचनाने भिती हळू हळू कमी झाली आणि आता पूर्ण गेली. माझ्या पाठीमागे माझ्याजवळ भाऊकाका आणि जानकीआई असल्यामुळे हे शक्य झाल. ह्यासाठी मी त्यांचा सदैव ऋणी आहे.
एकदा मला बँकेत काम करताना २-३ खोट्या सहीचे (तंतोतंत सही) चेक चूकून पास करण्याचा प्रसंग आला. अशावेळी मी जानकी आईस व भाऊकाकास प्रार्थना केली आणि आश्चर्य म्हणजे ज्याच्या अकाऊंट मधून पैसे गेले होते त्यांच्याबरोबर मी एकटाच साताऱ्याला जाऊन त्यांच्या नातेवाईकांडून हि गोष्ट कबूल करून घेतली व माझ्यावरील अरिष्ट टळलं. हि आईचीच कृपा म्हणायची, मला ह्यातून त्यांनी अलगद बाहेर काढल मला काहि काळीमा न लागता. त्यावेळी माझी मन:स्थिती फारच वाईट झाली होती. हा मला मोठा प्रत्ययच आला कि आई, भाऊकाका, एकविरा आई तसेच दत्तगुरु आपल्या पाठिशी आहेत.
आमच्या आयुष्यात भाऊकाका आणि जानकीआई आमचे रक्षणकर्ते आहेत असे वाटते आणि म्हणून आम्ही कुठेहि निःशंकपणे जाताना येताना हे आपल्याबरोबर आहेत असच धरून चालतो. आमच्या मोटारीवर पण पुढे आणि मागे प.पू. जानकीआईची छबी आहे. म्हणून आम्हाला कुठेहि जाताना त्या संरक्षण करतात तसेच आमच्याबरोबर असतात हिच भावना आहे.
।। जय जय जानकी दुर्गेश्वरी ।।
।। जय जय बायजी स्वरूपिणी ।।
श्री. योगिराज गोपाळ चौबळ (पुणे)
मो. ९९७०४५६६६२