
॥जय जानकी दुर्गेश्वरी ॥
तृतीय पारितोषिक
खर सांगु तर मला सावली वाचनाच्या आधिच स्वत: श्री जानकी दुर्गेश्वरी आईनी आपले देवदूत रूपात श्री अण्णा मामा सुळे बडोदा यांना माझ्या घरी पाठवल आणि आमची भेट झाली. ते का? कारण आईंना सर्व विदीत होत. ते मला सगळ घडल्यानंतर कळाले. मी शेखर वेरुळकर मुकाम रतलाम सध्या इंदौर येथे राहत आहे. माझ लग्न स्मिता ताम्हणे ह्या मुलीशी १९८४ मधे झाले. त्या वेळेस एकच मनात होत कि माझ्या संसारा मधे पहिला मुलगा असावा कारण त्या वेळेस माझ्या सख्या व चुलत भाऊ बहिणीना पहिली मुलीगीच होती. माझ्या इच्छे प्रमाणे खर ठरले मुलगा झाला पण त्याला २१ दिवसा नंतर देव आज्ञा झाली. मनासारख झाल्या नंतर, अचानक अस झाल्यावर दुःख सहन करणे अशक्य होते. पण ह्या वेळी पावेतो मी देवाला मानत होतो. पण मंदीरात जात नव्हतो. कारण मनात एकच होत कि देव हा सर्व ठीकाणी असतो तर मी त्याला मनापासुन हात जोडले तर त्याच्या पावेत माझा नमस्कार स्विकारला जाईल. दोन वर्षानंतर १९८६ मधे पुन्ह: माझी अधांगिनी गरोदर झाली. त्या वेळेस एकच मनात होत कि काय आणि कस होईल.
श्री अण्णा मामा सुळे वर्ष १९८६ मध्ये घरी आले, प्रथमच कशे कोठुन काही माहीत नव्हतं. माहित पडल्यानंतर आम्ही काही विचारू त्याच आधी त्यांनी काही अस सांगितल कि आम्ही विचारात पडलो. भेट झाल्यानंतर त्यावेळी त्यांनी सांगितलेले सर्व खरे निघाले. ते काय? आमच्या तर्फे सर्व वेरूळकर परिवार मध्ये विचारपुस करण्यात आली. रतलाम, उज्जैनच्या मधे उन्हेल ह्या गांवात आमची शेतीवाडी होती. तेथे जुन्या काळात एक मुलगा बाळगला होता. त्याचे भरणपोषण निट नाही झाल्यामुळे तो वारला व त्याचा श्रापामुळे ती माझ्या पिढीत मुलगा होणे अशक्य होते. तरी आपण एक प्रयत्न करू असे मामांनी सांगितले. भिती पोटी लगेच होकार आमच्या कडून देण्यात आला आणि मामांनी एक होम घरी केला आणि जातांना होमची भबुती गरोदरच्या पोटावर रोज लावावी सांगितले व एक कागदावर काही लिहुन त्याला आलमीरा मधे ठेवायला दिले व काही ही जन्म झाल्यावर त्याला वाचायला सांगितले व बडोद्याला परतले व पोथी सावली देण्यास आली. संसाराला गुंतल्या हेतु दिवस निघत गेले शेवटी तो दिवस आला. ३०-४-१९८९ ला मुलगा झाला अत्यंत हर्ष होता. मामांनी दिलेला कागद काढण्यात आला त्यात लिहलेले वाक्य, “मुलगा झाला असेल त्याचे नाव प्रतीक ठेवावे” डोळे उघडेच राहीले. त्या नंतर जिवनात देव एकमेव सत्य, त्याचा शिवाय पवन पान हलु शकत नाही. एक ही स्वांश जास्त घेऊ शकत नाही हे समजल. कारण त्यानंतर माझ्या सख्खे व चुलत बंधु भगिनी कडे सगळयांना मुलगा झाला.
संसारात गुंतल्यामुळे मामांनी सांगितलेले विसरलो आणि सावली ग्रंथ न वाचता एक साधारण पुस्तक म्हणून कुठेतरी ठेवण्यात आले. संसार ११ वर्ष व्यवस्थित चालु होता. वर्ष १९९८ मधे प्रतीक ला आजारपणा बद्दल दवाखान्यात भर्ती केले. त्यानंतर जिवनात भुकंप आले आणि जिवन अस्तव्यस्त झालं. त्याला जो आजार होता तो भारतात पहिला व विश्वामधे ८ ते १० लोकांना होता असे समजले. पुढचे ११-१२ वर्ष आम्ही त्याला घेऊन दवाखाने, नीम, हकीम, झाडफुक करणारे, मंदीर, मसजीत, दर्गा कुठे नाही गेलो अस म्हणाव करत सुटलो. त्यावेळी अक्षरश: लुबाडला गेलो. सगळा पैसा, सोने, चांदी गेले. माझ्या अंगावर लोकाची देणी पण भरपूर होती. त्यानंतर जिवनात जे निर्णय घ्यायला नको ते विचार येऊ लागले. पण आईचे काही वेगळेच निर्णय होते ते अगदी समजु शकलो नाही. कारण समय बळवान आणि देव तो देवच..
त्रासाचा अन्त द्यायचाच होता माझ्या साडु सुहास पालकरच्या मुलीचे लग्न होते. अहमदाबाद ला लग्नात पुन्हा त्रास प्रतीकला चालु झाला लग्नाच्या रिसेप्शनला कळण्यात आल की पुण्याला कोणाच्या घरी श्रीमती रंजना ताई धारकर ठाणे ह्या येत आहे. त्यांना जाऊन भेटावे (मरता क्यान करता) उधार पैसे घेऊन अहमदाबाद ते पुणे भेटायला गेलो, भेटल्यावर काहीच बोलु शकलो नाही. डोळ्यात फक्त अश्रू होते. मनातुन एक इच्छा होती माझ्या हातुन लोकसेवा असावी. अहमदाबाद ला परत येतांना सुद्धा एक घटना त्यांनी सांगितलेला प्रमाणे घडली ती काय? उल्लेख नाही करत कारण माझ्या जिवनात बरेच अनुभव आहे. किस्सा लिहता पाने भरत जातील. मुख्य त्यांचा आशिर्वाद घेऊन अहमदाबादला आलो आणि त्याच अवस्थेत प्रतीकला माझ्या सासु श्री पालकर यांच्या घरी तेला ठेऊन सवा वर्ष पावेत त्यांचा म्हटल्या प्रमाणे आम्ही रतलामला परतलो. दुसऱ्या दिवशी फोन आला He was allright आश्चर्य झाल. त्यानंतर प्रतीकचे आजारपण संपले आणि आज पावेत सर्व व्यवस्थित संसार चालु आहे. सावली पोथी घरात शोधण्यास आले. वाचन सुरु केले ते आज पावेत आईच्या कृपेने निरंतर चालु आहे. त्यानी दिलेले कुंकु त्यात कुलदेवता दाखविले होते ते रोज कपाळाला लागु लागले माझ्या मनातून जी लोक सेवेची इच्छा होती ती चालु झाली. मलाच समजण्यात नाही आल की कोण कोठून कशे लोक मला काहीपण विचारायला येऊ लागले. निवारणासाठी मी पण वेडा, आईचे नाव घेऊन जे मनात येईल सांगु लागलो. लोकांचे आजार, काम, होऊ लागले. मग समजल की हे सगळ काम आई करत आहे. ती माझी वाचा नसुन आईची असावी कारण त्या नंतर बरेच लोकांना आई वर विश्वास झाला त्याचे त्रास दूर झाले ‘काही लोकांना मी बरोबर गणदेवीला घेऊन गेलो व काही आपोआप जाऊन आले. आज ही हे कार्य निरंतर चालु आहे. कार्य माझ्या हातुन आई करून घेतात. ह्या पेक्षा मला आता जिवनात काही नको. कारण माझ पण हार्टच्या वाल्वच ऑपरेशन १९९६ मध्ये झाल होत. त्यानंतर बरेच त्रास होते आता फक्त औषध घेतो पण त्रास नाही. त्यांच्याच आशिर्वादाने सावली ग्रंथ लेखन श्री मधुकर सुळे. श्रीअण्णा मामा सुळे व श्री रंजना ताई धारकर तिघांचे मी ऋणी आहे. तीघेही माझ्या जिवनात कळत न कळत आले मी धन्य झालो ही संधी एखाद्यालाच मिळते म्हणून धन्य.
श्री. शेखर वेरूळकर
मो. ९६९१२५४००४
७०००३३४०२९ (इंदौर)