
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
माझी पत्नी सौ. मृणालला गेली १५ वर्षे मधुमेह आहे. त्यामुळे मधुन मधुन लहान मोठे आजार चालूच असतात. कधी कधी साधा वाटणारा आजारही गंभीर रूप धारण करतो. चारवर्षापूर्वी तीला असच दिवसभर बेचैन बेचैन वाटायचे सारख झोपून रहावेसे वाटायचे. खायची, जेवायची ईच्छाच होत नसे. फळ वगैरे कापून ठेवायचो, पण आजीबात कहीच खात नसे. मी तीला दिवसातून ३-४ वेळा थंडगार पाण्यात एनर्झल बनवुन प्यायला द्यायचो तेच फक्त ती कसेतरी संपवायची. अर्थात नंतर डॉक्टर मला रागवले की डायबेटीस पेशंटला ईतक्यावेळा एनर्झल पाजायचे नसते कारण त्यात साखर आणि मीठ असते. मृणालला काय झालय हे आम्हाला कळतच नव्हतं, डॉक्टर कडे नेल्यानंतर ते औषध द्यायचे, गूण आला नाही की परत नवीन औषध देत. पण अन्न काही पोटात जात नसे, सारखी झोपून असायची. एकदा तिने वालाचे बिरडे खाण्याची ईच्छा व्यक्त केली. पण बनवणार कोण? घरात मी आणि माझा मुलगा राहूल, चपातीवाली बाई रोज चपाती, भाजी बनवून जात असे. तीला बिरडे हा प्रकार माहित नव्हता. अखेरीस मी माझ्या मोठ्या बहिणीला, माईला (गुलाब देशपांडे) फोन केला. ती बिरडे घेऊन आली त्याच्याशी जेमतेम १ चपाती कशीतरी खाल्ली पण दुसऱ्या दिवसापासून परत उपास चालू, असे पंधरा दिवस झाले शेवटी प्रकृती ईतकी बिघडली की ती झोपून राहत असे आणि बोलणेही बंद झाले. आम्ही घाबरलो. मी माझा नातू राजेन्द्र देशपांडेला फोन केला त्याने राहूलने आणि मी गाडीत घालून राजेन्द्रच्या ओळखीच्या चव्हाण हॉस्पिटलमधे नेले, तिथे मात्र मृणाल चक्कर येऊन पडली. डॉक्टर समीरा ने तिला लगेच अॅडमीट केले. तिला तपासले, मृणालची शूगर ५३० झाली होती आणि बीपी लो होऊन ११० वर आला होता. लगेच इंजेक्शन दिले. सलाईन वगैरे लावली. थोड्या थोड्या वेळेने निरनिराळे इंजेक्शन देणे सुरु होते. माझा बायजींच्या नावाने धावा सुरु झाला. त्यांनी अेका स्पेश्यालिस्ट डॉक्टरांना बोलावले दोघांनीही निरनिराळ्या टेस्ट केल्या आणि सांगितलं की AcuteViral Hepatitis C DMC HTN हा आजार झालाय. माझा पुज्य बायजींचा धावा सुरुच होता. सचिनला फोन केला, तो लगेच आला. काही तासानंतर ती शुद्धीवर आली. आम्ही बाईजींचे नामस्मरण करत होतोच. ईथे सांगतो अप्रस्तूत होणार नाही की माझा मुलगा सचिन हा बाईजींशी संवाद साधत असतो आणि त्याला बाईजी मार्गदर्शन करत असतात. काही तासानंतर तिला बर वाटु लागले. सहा दिवसानंतर तिला डीसचार्ज मिळाला. त्यावेळेस डॉ.समीरा म्हणाल्या की या फार कठीण आजारातून बाहेर आल्यात, त्या सिरीयस होत्या. या दुखण्यातून परमपुज्य बाईजींनीच तिला बाहेर काढले यात शंकाच नाही.
*****
काही महिन्यापूर्वी ती अशीच दिवसभर अस्वस्थ होती. संध्याकाळ झाली तरी ती झोपून होती. मी तिला आमच्या नेहमीच्या डायाबीटीसच्या डॉक्टरकडे जाऊ सांगितल, पण म्हणाली काही नाही थोड्या वेळाने बरे वाटेल. अखेरीस रात्रीचे १० वाजले. आता मात्र ती बिछान्यातून उठून बसली, म्हणाली मला कसेचतरी वाटते आहे. आता झोपूही शकत नाही आणि बसूही शकत नाही. पोटात खूप दुखतय. ती फारच बेचैन झाली होती. रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. म्हणजे आमची डायाबीटीसची डॉक्टरचा दवाखाना बंद झाला होता. आता डॉ. केळकर, वजीरानाका, बोरीवली यांचेकडे फोन केला. कंपाऊन्डरने फोन उचलला. मला म्हणाला आता येऊनका दवाखाना बंद करतोय डॉक्टर घरी चाललेत. तरीहि बाईजींचे नाव घेतले आणि आम्ही मृणालला गाडीत घालून डॉक्टर केळकरांकडे जायचे ठरवले. बोरीवली आणि आमच्या चारकोप कांदीवली येथे मेट्रोचे काम सुरु आहे. रात्री ९ नंतर फारच जोमात काम सुरु असत. ट्रॅफीक जाम झालेला असतो. सगळीकडे गाड्यांची लाईन लागली होती. सौ. मृणाल पोटदुखीने कळवळत होती. मी आणि मृणाल बाईजींचे नाव घेत होतो. बाईजीआईंना विनंती केली कसही करुन डॉक्टरांची भेट होवू दे. हळू हळ टॅ्ृफिक कमी झाला. तो पर्यंत रात्रीचे ११ वाचले होते. आम्ही साडेदहाला निघालेलो वास्तविक दहा मिनीटांचे अंतर आहे पण आम्ही ११ वाजता पोहोतलो. म्हटल दवाखाना निश्चितच बंद झाला असणार पण आश्चर्य म्हणजे डॉक्टर थांबले होते. जणूकाही आमचीच वाट पहात होते. त्यांनी मृणालला तपासले, इंजेक्शन दीले, काही औषध, गोळ्या दील्या काळजी करु नका सांगितले. घरी परत येईपर्यंत मृणालची पोटदुखी थांबली होती, रात्री शांतपणे झोपली. ही सगळी बाईजी आईंचीच कृपा.
“जय जानकी दुर्गेश्वरी”
श्री. अशोक कारखानीस (कांदिवली)