
“जानकी आईचे साक्षात दर्शन”
अश्विन नवरात्र चालू असताना चौथ्या दिवशी ३ ऑक्टोबर २००८ ला शुक्रवार रोजी रात्री १० वाचता माझी नात कु. निरज देशपांडे बडोदे येथे मांजलपूर या ठिकाणी लहान मुला मुलींचे “अलैय्या-बलैय्या” या गरब्याच्या गायक वृंदामध्ये गात होती.
मंचावर गाणाऱ्या मुलींच्या पुढे माईकपाशी एक हिरवी काठ पदरांची (लुगडे) साडी नेसलेल्या व नाकात नथ व अंगावर भरघोस दागीने घातलेली सुंदर स्त्री मुलींबरोबर गरबे गात होती. मी त्यांना ताबडतोब ओळखले. देवी स्वरूपात जानकी आईच साक्षात होत्या. माझ्या जवळ बसलेल्या सौ. ला विचारले की मंचावर तुला कोण दिसते? तर ती म्हणाली “सर्व मुली गरबे गातात.” मलाच जानकी आई देवी स्वरूपात दर्शन देत होत्या. मी त्यांना विचारले कि जानकी आई आपण येथे? तेव्हा त्या म्हणाल्या “मी सर्वच ठिकाणी असते.” सतत तीन दिवस त्या दर्शन देत होत्या. काय ही अगाध लिला! जानकी आईंच्या दर्शनाने धन्य झालो! जिवन कृतार्थ झाले!
श्री. अरविंद द. खळे (बडोदे)