
सौ. जानकी आईंना शत् शत् प्रणाम
साधारण २००९ या वर्षी दिवाळीच्या अगोदर मला सौ. जानकी आईच्या पोथीचे पारायण करायची संधी मिळाली. माझी नणंद कै. सौ. वैजयंति सोलापूरकर हिने मला ही पोथी वाचण्यास दिली होती. माझी पोथी जवळ जवळ पूर्ण झाली होती. परंतु माझ्या या नणंदेच्या आकस्मिक निधनानंतर खंड पडला. शिवाय ही पोथी त्यांनी दुसरीकडून आणली असल्या कारणाने मला ती परत करावी लागली. ही गोष्ट माझ्या मनात कायम घर करून होती. परंतु इच्छा पूर्ण व्हायची असेल तर कशी होते ते पहा.
जानेवारी २०१८ मध्ये म्हणजे मागच्याच महिन्यात माझ्या यजमानांचे मित्र श्री खोपकर, मांजलपूर यांच्या घरी आम्ही गेलो होतो. तेव्हा जानकी आईंचा फोटो त्यांच्या घरात हॉलमध्ये होता. मी सारखी मधून मधून त्या फोटोकडे बघत होते.सारखे असे वाटत होते की हा फोटो ओळखीचा आहे आणि अचानकच मी त्यांना विचारले की हा फोटो जानकी आईंचा आहे का? त्यांना तर खूप आश्चर्य वाटले. त्यांना सविस्तर सर्व मागचा २००९ सालचा वृत्तांत सांगितला. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्याकडची एक प्रत मला भेट म्हणून दिली. आहे की नाही, हा आशिर्वाद सौ. जानकी आईंचा! मी दुसऱ्या दिवसापासून या पोथीचे पारायण सुरू केले व ते माझे पूर्णही झाले. माझी नविन वर्षाची सुरवात इतकी उत्तम झाली. हा सौ. जानकी आईंचा आशीर्वाद मला मिळाला.
सौ.वर्षा हेमंत हंबर्डे (बडोदे)