
बडोद्यातील विश्वामित्री येथे २४ मार्च १९८० रोजी पहिले वाचन झाले आणि त्याक्षणीच ‘सावलीचे’ पदार्पण माझ्या आयुष्यात झाले तें ‘सावली’ देण्यासाठीच असे म्हटले तर अतिशयोक्ति होणार नाही. माझ्या आयुष्यात सावली आली आणि तिच्या स्पर्शा शिवाय माझा एकही दिवस गेला नाही. माझ्या दिवसाची सुरुवात आईच्या आशिर्वादाने होते व पहिला चहा आईंना देऊनच मगच मी पिते, आईशी मी इतकी एकरुप झालेली आहे की जरा कुठे खुट्ट झाले तरी मी आईशी बोलल्याशिवाय रहात नाही. साधी ठेच लागली तरी माझे हात आपोआप जोडले जातात व धन्यवाद म्हटल्याशिवाय मी रहात नाही. माझ्या अनुभवांनबद्दल म्हणताना ‘धणी न पुरे गाथा’ असा वाक्प्रचार म्हणायला हरकत नाही. हे अनुभव लिहीतांना कोणता अनुभव लिहू हेच माझे मला कळेनासे झाले आहे.
आजही तो दिवस आठवला तरी अंगावर शहारे येतात व मन सुन्न होतं. ‘ती पिठोरी अमावस्या’ होती. शेवटच्या श्रावणी सोमवार असल्याने मी शंकरावर अभिषेक करत होते. एवढ्यांत फोन खणखणला आणि माझ्या पतीनी फोन उचलला. समोरून माझ्या धाकट्या बहिणीने तिच्या मुलाला दवाखन्यात भरती केल्याची दुःखद बातमी रडत रडत ह्यांना सांगितली. पण बाई (मी स्वत:) अभिषेक करत आहे तेव्हां तूं काळजी करू नकोस सर्व काही ठिक होईल असे सांगून तिची समजूत काढली. अभिषेक होतांच आम्ही दोघे ताबडतोब दवाखान्यात दाखल झालो. दवाखान्यातील वातावरण व माझ्या निपचित पडलेला भाचा पाहून कसंबसं स्वत:ला सावरून मी बहिणीला धीर देत बसले. केंव्हा संध्याकाळ झाली हे कळलेच नाही. मी तिला म्हटले तूं घरी जाऊन पिठोरीची पूजा व नैवेद्य करून ये, मग आम्ही घरी जाऊन परत येऊ. ती लगेज कडाडली, मी पूजा करणार नाही, ज्याच्यासाठी पूजा करते तोच तर निपचित पडलेला आहे. माझ्याच्याने पूजा करवणार नाही तर तूं मला आग्रह करू नकोस. शेवटी मी म्हणाले मी जेवण घेऊन येते व आम्ही अंबरनाथला (त्यावेळी आम्ही अंबरनाथ येथे रहात होतो) जाऊन दिड-दोन तासांनी परत आलो. परत आलो तर माझ्या भाच्याला बरं वाटायला लागल्याने माझी बहिण पूजेसाठी घरी गेली होती व लगेच मी आईचे आभार मानले. रात्री मी बहिणीसोबत राहिले आणि परत रात्री तो अस्वस्थ झाल्याने स्वत: डॉ. नीमला बोलवून सांगितले की आम्ही प्रयत्नांची शिरोकाष्ट करत आहोत. पण आम्हाला यश येईल असं वाटत नाहींच, तरी आता सर्व तुमच्या देवाच्या हातात आहे. मी बरोबर सावली ठेवली होतीच हे सांगायची गरज नाही. मी लगेच खोलीच्याबाहेर बसून सावली वाचायची परवानगी डॉ. कडून घेतली व लगेच माझे वाचन सुर केले. माझे आठ-दहा अध्याय झाले असतील नसतील तर लगेच बाहेरचा आरडाओरडा कानांवर आला. एक अत्यवस्थ स्त्री रुग्ण भरती झाला होता व त्यामुळे दु:खी नातेवाईक काही ही भान न ठेवता आरडाओरड करत होते. ‘अमावस्येची भयाण रात्र व समोरच्या अत्यावस्थ रूण बघून’ क्षणभर पुस्तक मिटायचा मी विचार करत होते. पण दुसऱ्या क्षणी मी स्वत:ला सावरले, मी वाचन चालु ठेवले व माझ्या मनात दुसरा विचार आला की कशावरून माझ्या वाचनाचा फायदा ह्या बाईला होणार नाही?’ आपण कशाला घाबरायचं, आई तर आपल्या जवळच आहेत. त्याच दवाखान्यात आणखी पण एक सहा महिन्याचे बाळ अत्यवस्थ होते. अशाप्रकारे तीन अत्यवस्थ रुग्णांमध्ये मी मूळची घाबरट बाई कशी वाचन पुरे करायचा प्रयत्न करत होते हे मला कळेच नाही. माझे वाचन पुरे होत असतांनाच माझ्या लक्षात आले की माझा भाचा डोळे उघडून माझ्याकडे बघून हसत आहे. मला यश येत आहे याची जाणीव मला झाली व माझ्या जीवात जीव आला, आणि त्या क्षणीच इतरांना सांभाळा अशी प्रार्थना मी आई जवळ केली. यथावकाश तीनही रूग्ण बरे झाले व माझ्या डोक्यावरचे ओझे उतरले. मी वाचत असतांना स्वत: डॉ. व परिचारिका तपासण्यासाठी ये-जा करीत होते व माझ्याकडे कटाक्ष टाकत होते व त्यांचा मला खूपच आधार वाटत होता. दुसऱ्या दिवशी स्वत: डॉ. माझ्या बहिणीला म्हणाले की हे यश आमचे नाही. तुमच्या देवामुळेच आपल्याला यश आले आहे. त्यानंतर माझा भाचा दहा-बारा वर्षांचा होईपर्यंत त्या डॉक्टरने त्याला फुकट तपासले कारण ह्या तीनही रुग्णांना मला सावलीमुळेच मिळाले अशी त्यांची समजूत होती. अशाप्रकारे आईकडे माझा भाचा मृत्युच्या दाढेतून सहीसलामत बाहेर पडला व माझ्या वाचनाचे सार्थक झाले.
शनिवार १४ जानेवारी १९९६ भोगीच्या दिवशी माझी मुलगी चि. शिल्पा बाळंतपणासाठी अंबरनाथला आली (मुहुर्त दत्तजयंती डिसेंबर १९९५ ला केला होता) किंक्रांतीच्या दिवशी सकाळी आम्ही दवाखन्यांत शिल्पाला तपासणीसाठी घेऊन गेलो.
नवराबायको दोघेही डॉक्टर आहेत. त्या दोघांचे एकमत झाले की संध्याकाळी तिने भरती व्हावे व मी हो म्हणून तिकडून काढता पाय घेतला. शुक्रवारी पार्ल्याच्या डॉक्टरनी शिल्पाला सांगितले होते की तुझी प्रकृति इतकी उत्तम आहे की शेवटपर्यंत नोकरी केलीस तरी चालेल. पण हे अगदी वेगळे मत पडल्यावर आम्ही ही गोष्ट जावयांच्या कानावर घातली. त्यांनी तिला परत घेऊन या असं सुचविल्याने जेवण आटोपून लगेच पार्ल्याला निघालो. अंबरनाथ स्टेशनवर आमच्यापुढे काही लोक कोंबड्या घेऊन होती. First Class मध्ये चढलो तर ठाणे स्टेशनवर एक माणूस कुत्र्याचे पिल्ल घेऊन चढला व आमच्या जवळच येऊन बसला. आम्ही जागा बदलली व कुर्ला स्टेशन यायच्या आधी उठून उभे राहिलो तर तो पण कुर्ल्यालाच उतरला. मी शिल्पाला म्हटले एकवीरा खंडोबा दोघांनीही आपल्याला सोबत केली आहे. पार्ल्याला डॉ. कडे संध्याकाळी गेलो. माझ्या पतींनी सर्व सविस्तर माहिती डॉक्टरला सांगितली व आम्ही शिल्पाला तुमच्या स्वाधीन केली आहे असं सांगितले. त्यावेळी तिला भरती करून रात्री आम्ही घरी आलो व सकाळ होतांच दवाखान्यात गेलो. तिने सांगितले डॉ. तीनचार वेळा तपासून गेले व मनांत भीतिची पाल चुकचुकली. आता फक्त सावलीचाच आधार होता. मी वेळ मिळेल तशी सावली वाचयाची असे मनाशी पक्के केले डॉ. अधून मधून तपासत होते व माझे पति जे अंबरनाथला गेले होते ते कधी परत येणार असे विचारत होते. मी तर आणखीनच घाबरून गेले व सावलीचाच आधार समजत होते. शेवटी Sonography करून बाळ कसे आहे ते बघून Operation चा निर्णय डॉक्टर नी घेतला मी सावली वाचत होते पण अजूबाजूच्या बायका कोण आहे, काय आहे. अशा चांभार चौकश्या करून भंडावत होत्या. शेवटी मी विचार केला ह्या कोणाच्या कोण, पण आस्थेते चौकश्या, विचारपूस करत आहेत तर आपण वाचन थांबवून त्यांच्याशी बोलायला हवें. असा विचार करून सावली बंद करायला आणि आतून ‘टॅहो’ ‘टॅहो’ यायला एकच गांठ पडली. त्यामुळे माझे जावई लांबून निरीक्षण करत होते. ते हा योगायोग पाहून एकदम चकितच झाले. आम्ही एकमेकांचे अभिनंदन करत असतांनाच आंतले शब्द कानावर पडले, ह्याला नानावटीत ठेवायला लागणार आहे. घाबरायचे कारण नाही. ‘मृत्युशी झगडून जगणारी मुलंच काहीतरी करून दाखवतात हे माझे शब्द लक्षात ठेवा.’ अर्ध्या तासाच्या आत आम्ही बाळाला घेऊन नानावटीत गेलो. दवाखान्यातील भयाण शांतता, एकीकडे माझे पति, एकीकडे जावई तर मी दवाखान्यापाशी बाळा घेऊन उभी. तेवढ्यांत शेजारच्या खोलीतून दोन बायका झोप येत नाही म्हणून बाहेर गप्पा मारायला आल्या. म्हणून त्यावेळी मला त्यांचा खूप आधार वाटला. आईच मला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत अशी खात्री पटली. त्यानंती पंधरा दिवस रोज पहाटे सहा वाजता येऊन नळ्यांनी सुशोभित केलेले बाळ बघावयाचे व काय हव नको ते अर्ध्यातासात बघून निरोप घ्यायचा. आजपर्यंत कितीतरी वेळा बाळ-बाळंतीण वेगवेगळ्या दवाखान्यात ठेवल्याचे ऐकले होते पण आज प्रत्यक्ष माझ्या देखतच, माझ्या घरीच हे घडत होते. दोन दिवस डॉक्टरच्या देखरेखीसाठी बाहेर ठेवण्यात आले होते. तेंव्हा पण शिल्पाबरोबर दोन दिवस मला रहायला लागले. त्यानंतर त्याला घेऊन घरी आलो व आठ-दहा दिवसांनी अंबरनाथला घेऊन आलो. पण येथेही आमची परिक्षा संपली नव्हतीच. त्याला कावीळ झाली व खूप काही Complications होऊन बाळ केंव्हा लहानाचे मोठे झाले हे कळलेच नाही, ज्या सावलीच्या आधाराने त्याला वाचविले तीच सावली घेऊन ८ ऑगस्ट १७ ला अमेरिकेला पुढच्या शिक्षणासाठी त्याने प्रस्थान केले. अशाप्रकारे डॉ. चे शब्द व आईवरची श्रद्धा फळाला आली.
२ मार्च २००६ रोजी आम्ही कुर्गला कॉफीचे मळे बघायला गेलो होतो. उद्या मळे बघायचे ठरविले आणि आधल्या दिवशी आजूबाजूचा परिसर बघत होतो. रात्रीचे जेवण झाल्यावर थोडं दूरवर फिरत असतांना दिवे गेले, आम्ही तेथेच थांबलो.सतांना एका गाडीच्या दिव्याचा उजेड माझ्या डोळ्यांवर पडला व मी भारावून मागे सरकले. तर खाली सरपटतांरस्ता होता व त्यावरून कोवाट्या उड्या घेत घेत जवळ जवळ २० फूट खोल मी गेले. भांबावून माझा पाय अडीच महिने Plaster होता पण मग काहीच झाले नाही. किंबहुना मी पडले होते हे लोकांना सांगूनही पटत नव्हते. अशावेळी सावलीच्या १६वा अध्यायांत जे घडले तेच माझ्या बाबतीत घडले असे म्हणता येईल. ज्या शेखरला आईनी झेलले त्यांनीच मलाही झेलले आहे. म्हणूनच मी म्हणते… “शेखर वैद्य नंतर मीच”
सौ. सिंधु सुरेशचंद्र गुप्ते (ठाणे)