
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
साष्टांग दंडवत नमस्कार, तुझ्या पदकमलांना, तुझी आमच्या वरची कृपा ही शब्दात सांगता येणारच नाही. कारण प्रत्येक क्षणी तु आमच्या पाठीशी किवां बरोबरच असते, म्हणूनच आम्ही निश्चिंत आहोत.
१६ ते १७ वर्ष झाली असतील तुझी “सावली” ही पोथी वाचुन तेव्हापासूनच तुझी कृपा अनुभवते. अगदी लहान सहान संसाराच्या अडीअडचणींत पण तु बरोबर असतेस व मार्ग दाखवतेस आणि सुखरूप अडचणींवर मात देऊन बाहेर काढतेस.
बऱ्याच वर्षांपर्वीची गोष्ट आहे. आम्ही आमचे स्वत:चे घरचे घर घ्यायचे ठरवले व ते बुकही केले. मग लोनसाठी बेंकेत अर्ज केले. लोन मिळवण्यासाठी बरेचदा असे प्रसंग आले की आम्हाला वाटू लागले की बहुतेक आपले स्वत:च्या घराचे स्वप्नच चूकीचे होते. पण जानकीआईची पोथी वाचली की आमची ती अडचण दूर व्हायची आणि सुरळीत होऊन लोन मिळून आमचे घर तैयार झाले.
असे बरेच अनुभव जानकीआईचे मला येत असतात की ती नेहमी माझ्या बरोबरच असते.
सौ. पुजा चौबळ (बडोदे)