
॥ श्री गणेशाय नमः ॥
॥ श्री कुलदेवतायै नमः । श्री गुरुदेवाय नमः । श्री सरस्वती माताय नमः । श्री जानकी आई नमः ॥
14 January 1999 चा दिवस, माझ्या डाव्या पायाच्या गुडघ्यात क्रेक गेली व पूर्ण पायाला प्लास्टर आल. डोक्टरांनी दीड महीना चे प्लास्टर सांगितलव २० दिवसांनी तपासणीसाठी बोलवल. मी राजन जीजूला रेकी देण्यासाठी सांगितल. ते व ज्योतीताई त्या दिवशी रात्री माझ्या घरी भेटायला आले. मला जानकी आई बद्दल त्यांनी महिती दिली व आईनची सावली वाचायला दिली. संकल्प करून वाचयची सुरवात कर ह्या त्यांच्या सांगण्याला मान देऊन दुसऱ्या दिवशी पासून मी वाचायला सुरवात केली व संकल्प ठेवला कि २० दिवसांनी दाखवायला जायच आहे त्या वेळेस माझ प्लास्टर निघुन जाय व महीन्याच्या आत मी चालती होऊन जाऊ.
मी जेव्हा सावली वाचायला सुरवात करायची कि माझ्या गुडघ्यात गडमथल होईला लागायची. गुडघ्यामधे सगळ वरखालती हलत असेल तस फील (Feel) होयच. ते इतक असह्य असायच कि मी वाचायच थांबुन टाकायची. मी थांबवल वाचायच कि ती गडमथल पण थांबायची व सुरवात केली वाचायची की परत सुरु होयची गडमधल.
पण २० दिवसात मी सावली पूर्ण केली व मग डॉक्टर कडे गेली. माझ्या आश्चर्यात त्यांनी प्लास्टर काढुन टाकायला सांगितल व घरी येऊन महीन्याच्या आत मी चालायला व घरची काम करायला लागली.
माझ्या जीवनातल्या ह्या प्रसंगामुळे आईंनची मी परमनन्ट (Permanent) भक्त बनुन गेली. त्यांच्या कृपेचा माझ्यासाठी हा पहीला अनुभव होता. मग छोटे मोठे असे बरेच अनुभव आले कि ज्याच्यानी मी जानकी आईच्या जवळ न जवळ होत गेली. जेव्हा मी त्यांना हाक मारली ते कुठल्या न कुठल्या रूपात आले मला माझ्या प्रोब्लेम्स (Problems) समोर धीट करायला.
बऱ्याच वेळा मी खुप थकते त्या वेळेस आईच्या मायेची जरूर भासते तेव्हा पण माझ्या डोक्यावर प्रेमाचा हात फिरतो, माझ डोक उशीवर नसुन कोणाच्या मांडीत आहे असा भास होतो. मला त्या दिसत नाही पण त्यांची (Presence) हाजरी मी अनुभवते.
खर सांगु तर आईनच प्रेम व कृपा इतकी आहे कि ते शब्दात मावत नाही. तरीही थोडाफार प्रयत्न केलाय.
राजन जीजु (राजन सुळे), माझे रेकी गुरुनी ‘सावली’ देऊन खरच मला परमनन्ट (Permanent) सावली दिली. थेन्क यु (Thank You) जीजु.
सौ. नेत्रा कर्णिक (बडोदे)
मो. ९८२४०९३१८९