॥जय जानकी दुर्गेश्वरी॥

           ‘कायस्थ प्रबोधन’ च्या अंकात ज्यावेळी जानकीआईवर लिहायचे आहे असं वाचलं तेव्हा मला खुप आनंद झाला. परत मनात विचार आला मी काय लिहीणार ? जानकीआईबद्दल? तिची थोरवी किती मोठी आणि मी एक सामान्य स्त्री, परंतु नाही मी माझा लिहीण्याचा विचार नक्की केला मला जसं येईल तसं.

          सावलीचे श्रेय जाते श्री मधकर सुळे यांना. कारण त्यांनी ती सावली इतकी सुंदर लिहीली आहे. कारण सतत त्यांना लाभलेला जानकी आईचा वरदहस्त. त्यांच्या त्या लिहीण्याच्या शैलीमुळे सतत पुढे उत्सुकता वाढत जाते. आता असेल पुढच्या अध्यायात वाचता वाचता चित्र उभे रहाते डोळ्यापुढे. माझ्या एका मैत्रिणीला पण सावली वाचायला दिली त्यांना पण खुप आवडली.

           सुरुवातीपासून जानकीआईच्या लहानपणापासूनचे वर्णन केले आहे. लहान असताना मंदिरात तिला आलेला अनुभव, ती कशी देवाच्या सानिध्यात राहून आली होती. तेव्हाच आपल्याला समजते की, ती कोणी सामान्य स्त्री नव्हती. तिच्या आजी-आजोबांनी प्रेमाने केलेले संगोपन हे सर्व वाचायला मिळाले.

          ती जानकीआईचा विवाह कै. श्री शांताराम सुळे ह्यांच्याशी झाला त्यात त्यांनी लिहीले आहे की नाव शांताराम असले तरी त्यांचा स्वभाव रागीट होता. त्यांना घरात जे चालत होते ते आवडत नव्हते. कारण पत्नी प्रेम दिसते त्यांनी सांगितले होते की, आज तुझं कौतुक करतील पण नंतर नावं ठेवायला कमी करणार नाहीत. परंतु जानकीआई शांत व संयमी होती. संसाराचा गाडा व्यवस्थित चालु ठेवण्यासाठी एक रागीट असेल तर दुसऱ्याने शांत असावं लागतं. सावली मध्ये हेच एक एक तिच्या स्वभावाचे पैलू दिसून येतात.

           तिला माणसांप्रमाणे प्राणीमात्रांची पण दया होती, हे तिच्याकडे जखमी भुजंग येत होता. त्याला अंगारा लावून तिने कसे बरे केले ते सांगितले आहे. याच्यात तिची सेवावृत्ती दिसून येते.

         असे अनेक प्रसंग नमुद करावेसे वाटतात, पण काही काही उदा. देऊन मी सांगत आहे. जेव्हा ती गुप्ते कुटुंबा बरोबर पावागडला दर्शनाला गेली होती. तेव्हा त्यांना एवढं वर चढून गेल्यावर मंदिर बंद होताना दिसले. पुजाऱ्याची जेवण्याची वेळ झाली असल्यामुळे पुजारी दरवाजा उघडायला तयार नव्हता. जानकीआईच्या कृपेमुळे तिथे खुप भुंगे आले आणि पूजाऱ्याभोवती फिरु लागले. पुजाऱ्याने जानकीआईची माफी मागताच ते भुंगे निघून गेले व पुजाऱ्याने दार उघडून सर्वांना सुंदर महाकालिकेचे दर्शन घडवले. तिथून परत निघाल्यावर त्यांना देवीचे वाहन वाघ स्वत: दर्शन देण्यासाठी आला. आधीच दुपारची उन्हं तापलेली आणि त्यात समोर वाघ उभा. सगळ्यांची भितीने दाणादाण झाली परंतु जानकीआईने समजावले. तेवढ्यात एक सुंदर बालिका तिथे पाण्याचा घडा घेऊन आली. सगळ्यांना तहान लागलीच होती. ते थंडगार पाणी पिऊन ते सगळे तृप्त झाले. नंतर जानकीआईने सांगितले सर्वांसाठी पाणी घेऊन स्वतः देवी आली होती.

              ती जानकी आई स्वभावाने जरी शांत असली तरी काही प्रसंगात तिचा रागीट पणा दिसुन येतो. तो पण तिच्या स्वभावाचे वेगळे पैलू दिसून येतात.

           उदा. एका शेतकऱ्याने जानकी आईच्या पतीचा केलेला अपमान ती विसरली नव्हती. त्या शेतकऱ्याने आपल्या पतीची माफी मागेपर्यंत ती त्याला धडा शिकवत राहिली. त्याच्या शेताचे नुकसान केले, याच्यातून तिला पतीचा झालेला अपमान सहन झाला नाही. पतीचा अपमान एखादी पतीव्रता स्त्री कशी सहन करु शकेल ? मुंबईला गेल्यावर पण भाचा व त्याचा मित्र यांच्यात बुवाबाजीवर झालेला कितीतरी लांब झालेला संवाद कळला आणि तिच्या भाच्याने माफी मागितल्यावरच राग शांत झाला. कारण तिचे जे लोकांसाठी त्यांच्या कल्याणासाठी करणे हे बुवाबाजी नव्हते.

           आपले मुल सुदृढ असावे असे प्रत्येक आई वडिलांना वाटते. परंतु हिराच्या पोटी जेव्हा विद्रुप बाळ जन्माला आले त्यावेळी तिने जानकीआईचा धावा करताच. ती स्वत: आली बाळाला बघून हिराला सव्वा महिन्यापर्यंत उतारा करायला सांगून कसं परत सुंदर बाळ हिराच्या हातात दिलं ह्या प्रसंगावरून दुसऱ्यांचा किती कळवळा होता तिला हे दिसून येते.

           हे सर्व प्रसंग वाचता वाचता सगळ डोळ्यांपुढे येते आणि असं वाटतं की, आपण पण या सगळ्यांचा एक भाग आहोत. प्रत्येक वेळी जानकीआई सर्वांचे हित बघत होती. तिच्या सांगण्यावरुन आत्माराम खोपकरांनी केलेला फोटोग्राफीचा व्यवसाय त्यात त्यांना आलेले यश हे सर्व जानकीआईच्याच कृपेने तिला जे शरण गेले त्यांची ती सतत काळजी घेत होती. सगळ्यांचे रक्षण करण्यासाठी ती ह्या भूतलावर आली होती.

               किती जणांना तिने देवाचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला ज्यांच्या भाग्यात होते त्यांना देवाचे दर्शन झाले जसे की, ती कित्येक वेळा ओव्या गाताना देवींची सुंदर वर्णन करती असे. ऐकणारे मंत्रमुग्ध होऊन ऐकत तिने केलेले वर्णन परंतु बघणाऱ्यांना जानकीआई न दिसता तिच्या जागी स्वतः नखशिखान्त नटलेली सुंदर दुर्गाभवानी दिसत असे. ज्यांना असे देवीचे साक्षात दर्शन घडले ते खरंच खुप भाग्यवान होते. तर काही जणांना देवाचे दर्शन देण्याचा प्रयत्न करुनही त्यांना घेता आले नव्हते.

            ती फक्त मनुष्यप्राण्यांसाठी नाही तर तिच्या घरातील गाई-गुरांसाठी पण एक मायेची सावली होती. किती वेळा सावली वाचताना असं वाटतं की आपण नशीबवान नाही जितके तिच्या काळातील लोकं होते. ज्यांना ज्यांना जानकीआईचा सहवास लाभला. आपण सावलीतून अनुभव घ्यायचा.

          ‘सावली’ कार श्री मधुकर सुळे ह्यांच्यामुळे आज आम्हाला जानकीआईची थोरवी कळली. ‘धन्य धन्य ती माऊली, अशीच निरंतर राहो आमच्यावर सावली’.

सौ. दिपाली दिलीप अधिकारी 

मो. ९८६९८३०७७६ (डोंबिवली)

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *