
॥जय जानकी दुर्गेश्वरी ॥
‘जानकी आई’ हा शब्द उच्चारताच आईच्या प्रेमाची एक सुखदजाणीव आणि विशेषतः भक्तीमार्गावर उन्नत होण्याच्या प्रक्रियेला चालना मिळणारा शब्द असेच वाटते. जीवनात सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणी मला जानकी आईची आठवण न येणे हे केवळ अशक्य आहे.
जानकी आईंच्या बाबतीत मला आलेला अनुभव मी (सौ. अनघा अनिल चित्रे) नमूद करते आहे. सन २००८ मध्ये माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही कडापाच्या कडापकरीण देवीच्या दर्शनाला गेलो होतो. या देवळात जानकी आईच्या रूपाने स्वयंभू त्रिशूळ जमिनीत आलेला आहे.
मी व माझे कुटुंबीय यांनी ओटी भरली व निमंत्रण पत्रिका ठेवून त्यांना लग्नाचे निमंत्रण दिले. आम्ही डोळे बंद करून मनोभावे प्रार्थना करत होतो. डोळे उघडल्यावर आम्ही पाहिले की त्रिशूळ अत्यंत वेगाने कंप पावत आहे.
आम्ही याचा अर्थ तेथील पुजाऱ्यांना विचारला असता ते सुद्धा आश्चर्यचकित झाले व अशी घटना अत्यंत विरळ म्हणजे लाखात एक होत असल्याचे सांगितले. तुम्हाला जानकीआईने कृपाशिर्वाद दिला आहे असे सांगितले.
अशा प्रकारे आम्हांस जानकी आईंची प्रचिती आली व मुलीचे लग्न निर्विघ्नपणे पार पडले.
जानकीआईंना शतकोटी प्रणाम!!!
सौ. अनघा अनिल चित्रे
मो. ९८३३३२१२१५ (अंधेरी)