
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
मी आणि माझी पत्नी सौ. मृणाल अशोक कारखानीस प्रत्येक वेळी आमच्यावर आलेल्या कठीण प्रसंगातून आम्हाला ज्या पूज्यनीय बाईजींनीच बाहेर काढले त्यांचे आम्ही आभारी आहोत. पण मुख्य म्हणजे बाईजींची पोथी लिहीणारे माझ्या मोठ्या बहीणीचे, सौ. नंदा चे पती श्री मधुकर सुळे, ज्यांना आम्ही दादासाहेब म्हणजे त्यांचे आम्ही जन्मभरीचे रुणी आहोत. “सावली” हा ग्रंथ किंवा आपण पोथी म्हणूया यातील प्रत्येक प्रसंग वाचताना डोळ्यसामोर प्रसंग प्रत्यक्ष घडतोय अस वाटत राहत. इतकी भाषा ओघवती आणि वास्तविक आहे. काही प्रसंग तर परत परत वाचावेत असे लिहीले गेले आहेत. ह्या पोथीचे पहिले वाचन १९८० साली झाले. त्या वाचन समारंभासाठी माझी पत्नी सौ मृणाल मुंबईहून मुद्दाम आली होती. ती त्या प्रसंगी वाचन ऐकून अक्षरश: भारावून गेली होती. तीला प्रत्येक प्रसंग जवळ जवळ पाठ झाला होता आणि मुंबईला परत आल्यावर मला तो साग्रसंगीत तीने ऐकवला. पुज्यनिय बाईजीची महतीनी ती भारावून गेली होती आणि ति. दादासाहेबांनी केलल्या अप्रतीम लिखाणाने सर्वच प्रसंग डोळ्यासमोर उभे केले गेले होते. त्या वेळेपासूनच आम्ही ‘सावली’ पोथी कधी प्रकाशित होते याची वाट पहात होतो. आणि सावली प्रकाशित झाल्यावर त्याची कॉपी मिळवून आम्ही वाचतो आणि त्याची पारायणे केली. त्यानंतर कुठलेही संकट आमच्यावर ओढावले तर आम्ही पोथी चे पारायण करायचो आणि आम्ही त्या संकटातून बाहेर पडत असू. हळू हळू आमचे अनुभव आम्ही इतराना पण सांगितले आणि ते पण पोथी चे वाचक बनले.
खर म्हणजे ‘सावली’ ही आज एक अप्रतीम पोथी आहे. मुंबई मधे घरोघरी विशेषत: सी.के.पी. लोकांकडे ही नित्यनेमाने वाचली जाते, आणि लोकांना ह्याचा पॉझिटीव अनुभव येत असतो, त्याची कबूली आम्हाला अनेकांनी दिली आहे. ईतके अप्रतीम साहित्य दादासाहेबांनी निर्माण केल्याबद्दल सगळेच त्यांचे ऋणी आहेत. त्यांच्यावर सरस्वतीचा वरदहस्त आहे याबद्दल शंकाच नाही. त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
॥ जय जानकी दुर्गेश्वरी ॥
श्री. अशोक कारखानीस (कांदिवली)