Sawali Saurabh
Sawali Saurabh

 गुरु ॐ 

।।जय जानकी दुर्गेश्वरी नमः।। 

काटेरी मुगुट 

           सावली ग्रंथात उल्लेख आला आहे की श्री जानकी आईने आपल्या डोक्यावरील काटेरी मुगुट आपल्या मुलीच्या डोक्यावर घातला व आपले कार्य पुढे चालविण्यास तिला सांगितले. हा काटेरी मुगुट काय आहे? काटेरी मुगुट म्हणजे काय ? आपल्या मुलीच्या डोक्यावर का बरे घातला? हे प्रश्न मला नेहमीच पडत असे. म्हणून मी जानकी आईला विनंती केली की आई तूं मला ह्याचे रहस्य सांग. आणि आई कृपेने माझ्या अल्प मतिला जे कळले ते असं…….

          लआपण मुगुट कोठे घालतो? तर डोक्यावर! डोक्यामध्ये काय असते? तर बुद्धी! काट्यांमुळे काय होते ? तर काटे टोचाल्यामुळे दुःख होते! इथे काटे हे अज्ञानाचे प्रतिक आहे. अज्ञानामुळे आपण जीवभावावर येतो, देह बुद्धीवर येतो, आपण मर्यादीत होतो. त्यामुळे दुःख हे येणारच. आपले मुळ आत्मस्वरूप आहे. आपण अमर्यादित आहोत. नित्य आनंद स्वरूप आहोत. परंतु त्या अज्ञानरूपी काटेरी मुगुटामुळे आपण आपले खरे आत्मस्वरूप विसरून जीवभाव धारण करतो व दुःखी होतो.

          तर मग संत, जे सतत आत्मस्वरूपात मग्न असतात, हा काटेरी मुगुट का घालतात? तर असे चिखल साफ करण्यासाठी चिखलात ऊतरावे लागते, त्या प्रमाणे संतांनासुद्धा लोक कल्याण्यासाठी, भक्तांच्या डोक्यावरील अज्ञानरुपी काटेरी मुगुट काढण्यासाठी, जीवभावाचा काटेरी मुगुट घालावा लागतो. त्यांना आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपल्या नित्य आत्मस्वरूपावरुन थोडे खाली म्हणजे देहबुद्धीवर यावे लागते. आणि तरच ते आपल्याशी संवाद साधु शकतात. आपण जीवभावामुळे, अज्ञानामुळे जे दुःख भोगतो, तसे दुःख त्यांना होत नाही. कारण देहबुद्धी बरोबरच त्यांचा आत्मभाव ही जागृत असतो. ते नित्य आनंदीच असतात. चिखलात ऊगवणाऱ्या कमळाला जसा चिखलाचा स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे आपल्यासारखे संसारात राहुनही त्यांना संसारातील दुःखांचा त्रास होत नाही.

         आपल्याला वाटते हा काटेरी मुगुट संतांच्याच डोक्यावर बरा. त्यांनी फक्त आपल्या सांसारीक गरजा पुरवाव्या. पण आपल्याला हे माहीत नसते कि त्यांच्या डोक्यावरील मुगुट व आपल्या डोक्यावरील काटेरी मुगुटात खूप फरक आहे. आपल्या आज्ञानामुळे तो अपाल्या डोक्यावर आला आहे. संत तो लोक कल्याण्यासाठी धारण करतात.

          ती जगदंबा, दुर्गेश्वरी हा काटेरी मुगुट घालुन आली, आपल दुःख दूर करायला. आपल्या डोक्यावर तिन हा मुगुट घातला नसता तर तिचें कार्य कोणी चालु ठेवले असते? आपल्या डोक्यावरील काटेरी मुगटरुपी अज्ञान काढण्यासाठी, अपाल्याला ज्ञानामृत पाजून, आपल्या डोक्यावर आत्मस्वरूपी सोनेरी मुगुट घालण्यासाठी ही जगदंबा नेहमीच तत्पर असते. नुसतेच संसारिक सुख नव्हे तर आपल्या भक्तांना शाश्वत आनंद मिळवून देण्यासाठी, भवपार नेण्यासाठी ही दुर्गेश्वरी नेहमीच विविधरुपांनी अवतरत असते.

          हे आई जगदंबे, जानकी दुर्गेश्वरी, आम्ही तुला शरण आलो आहोत. आमचे अज्ञान दूर कर. आम्हाला प्रकाशाच्या मार्गावर ने. तो आत्मस्वरूपाचा, शाश्वत आनंदाचा सोनेरी मुगुट तूं आमच्या डोक्यावर घाल.

॥ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय। मृत्योर्मामृतं गमय॥

श्री राजन मधुकर सुळे (बडोदे)

Click to rate this post!
[Total: 1 Average: 5]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *