
लक्ष्मणा तिष्ठत कां बसला
लक्ष्मणा, तिष्ठत कां बसला,
त्वरित जाऊनि शिवपिंडीवर, वाहुनि येई फुलां ।।धृ ।।
तिथे सदाशिव तुला भेटतील
काय हवे ते प्रश्न ही करतील
माग हवे ते तुजला देतील,
वंदुनि पदकमलां ।।१।।
गाभाऱ्यामधी असे पहिला
गलीच्छ ब्राम्हण तिथै बैसला
शिवपिंडीवर पाय ठेविला,
भाव न मनी पटला ।।२।।
प्रश्न तयाने केला सुंदर
काय हवे ते माग रे लवकर
परी पाहतां पाय पिंडीवर
क्रोध मनीं आला ।।३।।
पुढे जानकी त्यास विचारी
काय बोलला शिवत्रीपुरारी
शिव न होते परी दरिद्री
ब्राम्हण बसलेला ।।४।।
अरे अभाग्या काय तू केले
तेच सदाशिव तिथे बैसले
भाग्याचे क्षण कसे निसटले
भ्रमांत कां पडला
लक्ष्मणा काय करुनि बसला?
Click to rate this post!
[Total: 2 Average: 4.5]