
धांव पाव जानकी माता
धांव पाव जानकी माता, वाट किती पाहू?
तुझे नाव घेता घेता, अश्रु किती वाहू ।।धृ ।।
अश्रुधारा लागे माझ्या, अशी लोचनांत
हृदय नाही कां गे द्रवले, बैसलीस शांत
तूच असता सर्व मजला, उगी कशी राहू…. ।।१।।
स्मरण मात्र सन्मुख येशी, अशी तुझी कीर्ति
आज काय तोकडी पडली, सांग माझी भक्ती
तुझ्या सावलीची मी वाट किती पाहू?……. ।।२।।
साद पाडसाचा जेंव्हा, असा येई कानी
गाय शोधित येते, जशी हंबरोनी
तशी आई आली, घाली गळ्या मध्ये बाहू…… ।।३।।
Click to rate this post!
[Total: 2 Average: 3]