या कठोर वर्तनाने शकुंतलेची अवस्था मोठी केविलवाणी झाली. खूण म्हणुन दिलेली हातातली अंगठी पण तिच्या नकळत कुठे पडली हे तिला माहीत नाही. अशारितीने ‘खूण’ न पटल्याने राजा दुष्यन्ताने शकुंतलेचा स्विकार केला नाही. उलट तिला कुठल्याहि प्रकारचा आश्रय न देता परत जाण्याची आज्ञा केली . ती राजदरबाराच्या बाहेर आली आणि दैवाला दोष देऊ लागली . जगण्यात तिला काहीच स्वारस्य वाटेना . तिच्या दुःखाला विश्व थिटे झाले. तिचे डोळे पाणावले .अत्यंत करुणार्द स्वरांनी ती म्हणाली ,” नाहीच अर्थ जगण्यात
भू माते घे उदरात —”

शकुंतला : नाहीच अर्थ जगण्यात I भूमाते घे उदरात II धृ II

जन्मताच अंतरी माता I सोडिले वनी मज ताता
दुर्दैव करी मज साथ I आडवे येई जीवनात II १ II

मायेत मला वाढविले I त्या पित्यास सोडुनि आले
यौवनी मदन हृदयात I आंधळी प्रीत करी घात II २ II

ते बोल मधुर ऐकून I फसलेच प्रीति गुंतून
नृप शब्द मधुर तोंडात I अंतरी वीष उदरात II ३ II

जाती हे स्वजन टाकून I नृप मलाहि दे सोडून
अंधार दिसे जिवनात I लाभू दे सौख्य मरणात II ४ II

आकांत ‘जानकी’ करित I घेतले जेवी उदरात
तू पाहु नको मम अंत I घे दुभंगुनी पदरांत II ५ II

कोमल कर अंगुली त्यजूनि शचि तीर्था पडली >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *