शाङ्गरव म्हणाला , “राजन, ही स्त्री आपली पत्नी आहे. कण्वांच्या आज्ञेने हिला इकडे आणली आहे. हिचा आपण स्विकार करावा.” हे ऐकून राजास आश्चर्य वाटले. त्याने कानावर हात ठेवले आणि म्हणाला , “ हे काय कुभांड !!! ही स्त्री माझी पत्नी आहे!!! हिच्याशी माझा विवाह झाला आहे!!! पूर्वी कधिही हिला पाहिल्याचे मला स्मरत नाही. त्यातून ही गर्भवती —- छे ! छे ! छे ! मजवर काय कुभांड रचले आहे. “ ______ “मजवरी रचिले काय तुफान __”
राजा दुष्यन्त : मजवरी रचिले काय तुफान II धृ II
राजर्षि सम कण्व मुनिंनी
जिला धाडिली भार्या म्हणुनी
स्विकारिलें कधी नच ये स्मरणी
कां करिता अपमान II १ II
कण्वाज्ञा शिरी वंद्य मानली
आजवरी नच कधिही भंगली
पुरुवंशाची लाज राखली
ठेवुनि गुरुजनी मान II २ II
बध्ध जाहलो या युवतीशी
दर्शन नच ये परि स्मरणाशी
गर्भवती मी स्विकारु कशी ?
ठेवुनि तुमचा मान— II ३ II
राजनिती मी श्रेष्ठ मानली
धर्माज्ञा मी कधी न भंगली
पर ललनेला घरी आणली
प्रजेत होई तुफान — II ४ II
हीच वैरिणी असे जारिणी
कलंक नच मी घेई लावुनी
जा माघारी हिला घेउनी
नच आज्ञा अवमान II ५ II