हरिणाची शिकार करण्यास आलेल्या दुष्यन्तास हरिणासारखे नयन असलेली शकुंतला पाहील्यापासून काहीच सुचेनासे झाले. त्याचा शिकारीचा उत्साह तर पार मावळून गेला. शकुंतलेची भेट घेण्यासाठी त्याची पाऊले नकळत पुन्हा पुन्हा उद्यानाकडे वळू लागली . इकडे शकुंतलेची पण तीच परिस्थिती झाली. तिचे डोळे सारखे दुष्यन्ताकडे लागले. दोघेही अनपेक्षितपणे आपआपल्या व्यथा प्रगट करण्याच्या हेतुने उद्यानाकडे वळले. शकुंतलेकडे पाहुन राजा दुष्यन्त म्हणाला,
“कुरंग नयने शकुंतले तुज बघता जडली प्रीति “…..

राजा : कुरंग नयने शकुंतले तुज बघता जडली प्रीति
व्यथा जिवाची प्रकट कराया आलो एकांती II धृ II

मृगया हुकली तपोवनी मृग पळती चपळ गती
नयन शराने मृगया माझी केलीस तू युवती
जखम शराची रुजेल फिरता कोमल कर वरती II १ II

शकुंतला : ऋषि कन्या मी रंक वनीची ,राव तुम्ही नृपति
कांस नृपाची सार्थ व्यर्थ वा मना पडे भ्रांति
गरुड भरारी ,फुलपाखरू ,उंच न विहरे अति …II २ II

राजा : शापभ्रष्ट तू तपोदेवता आलिस भूवरती
पंखाविण वनदेवी किंवा सुंदर दुसरी रती
सुंदरतेचे अवनीवरती नृप अधिपति असती … II ३ II

शकुंतला: प्रति पाळिले प्रेमे ज्यांनी , ते आश्रमी नसती
थोरा पुसुनी नसे घेतली , प्रिय सखी संमती
चंचल अलिगुज नृप हृदयी मज स्थान कुठे निश्चिती ? II ४ II

राजा: गांधर्वाच्या विधी विवाहा मुनिवर हे मानती
योग्य तुला भूपति लाभता कण्व न मुळी कोपती
पट्टराणी पदि आरूढशील तू राज्य हृदयी निश्चिती II ५ II

शकुंतला: मधुर स्मित वचनाने फुलली रोमांचित कांति
मनी हुरळुनी लज्जित होता ,शब्द न मुळी स्फुरती
सलज्ज कंपित देह भयाने सोड करा नृपति II ६II

राजा: सहज सोडण्या नच धरिला मी कोमल कर हाती
‘ राजमुद्रिका ‘ करी अर्पितो दृढ जडली नाती
दीर्घ प्राशू दे शुभसमयी ‘अधरामृत ‘ एकांती II ७ II

अवमानिशी या तपोधनाते >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *