अशा तऱ्हेने शकुंतलेने बऱ्याच खुणा पटविण्याचा प्रयत्न केला. पण व्यर्थ !!! राजा दुष्यन्तास काहीच स्मरत नसल्याने त्याने त्याचा स्विकार केला नाही. या कारणास्तव ती राजाला दोष देऊ लागली . त्यावर राजा दुष्यन्त म्हणाला , “ मला दोष देण्यात काय अर्थ आहे ? तू आपल्या दैवाला दोष का देत नाहीस ? “ ——- दूषण खोटे मज कां देते
कां न आपुल्या दैवा दुषिते “

राजा दुष्यन्त : दूषण खोटे मज कां देते
कां न आपुल्या दैवा दुषिते II धृ II

विवाहीत मी झालो तुजशी
कण्व आश्रमी ऐसे वदशी
संभ्रमात मी मला न स्मरते
कुभांड मजवरी कां हे रचिते II १ II

कोमल कांति रुप मनोहर
अनिवारे मन धावे तुजवर
गर्भवती , परिणिता तू दिसते
परिग्रह लांछन मज हे गमते II २ II

मधुर मधुर मृदू वचन बोलते
स्त्री बुद्धि ही उपजत गमते
खूण प्रीतिची अंगुली नसता
सांग सहज मज कां भुलविते — II ३ II

स्वप्नी कधी ना घडले दर्शन
अंश उदरि तव येईल कोठुन
पाप तुझे मज शिरी ठेवुनी
पुरुवंशा कां कलंकिते II ४ II

राजाश्रय ना स्वजनाश्रयही
अनाथ झाली अबला तू ही
राजनिति मज कठोर वदते
अनुग्रह तुजवरी अशक्य ते — II ५ II

नाहीच अर्थ जगण्यात >>

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *