शकुंतला पत्र लिहीत असताना राजा दुष्यन्त एकाएकी आला आणि कमलपत्र हातात घेऊन पाहतो तो त्या कमलपत्रावर फक्त अश्रूबिंदू . शकुंतलेच्या करांगुलीत घातलेल्या तिच्या राजमुद्रिकेकडे पहात राजा दुष्यन्त म्हणाला. “यातील एकेक अक्षर प्रतिदिनी मोजीत जा. ते पूर्ण होण्याच्या पुर्विच मी तुला अंतःपुरात नेण्याची व्यवस्था करीन .” असे आश्वासन देऊन राजा दुष्यन्ताने शकुंतलेचा निरोप घेतला . या हर्षानंदात तिची अशी काही अवस्था झाली की अतिथींचा सत्कार करण्याकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. एके दिवशी तपोधन दुर्वास ऋषि कण्वाश्रमाच्या अंगणात अतिथी म्हणुन आले आणि शकुन्तलेला मारु लागले ,पण ती राजाच्या चिंतनात मग्न असल्याने तिला काही ऐकू गेले नाही. यामुळे दुर्वास ऋषि संतप्त होऊन त्यांनी तिला शाप दिला .”तू ज्याचे चिंतन करतेस,तो तुला विसरुन जाईल .” “ अवमानिशी या तपोधनाते ——-”
दुर्वास ऋषि : अवमानिशी या तपोधनाते
दुष्कृत मज हे मुळी न साहते —- II धृ II
भिक्षेविण याचका फिरविते
शकुंतले तुज मुळी न शोभते
कोपानल कां फुका दुणविते
कां नच देऊ वद शापाते II १II
“तन्मय चिंतनी ज्याच्या असते
विस्मरेल तुज तो स्मरणाते
धिक्कारिल तुज विसरुनी नाते
दुर्वासाच्या महा शापाते II २ II
अनसूया: दया उचित नच कोप मुनीला
अपराधचि हा नकळत घडला
शापदग्ध नच करी कलिकेला
उ:शापुनी फुलवी जीवनाला II ३ II
दुर्वास ऋषि : नकळत घडला प्रमाद म्हणुनी
उ:शापच मी देतो फिरुनी
स्मृति चिन्हा ती दाखविता झणी
स्मरणा येईल पुनरपि नाते II ४ II
होईल अमुची सखी लाडकी राजाची राणी >>