श्री नृसिंहसरस्वती जन्म (अ-११)

ॐ ॐ ॐ

धरतीवर आज पहा नवल वर्तले 

प्रणव शब्द उच्चारित बाळ जन्मले ।। धृ ।।

होईल हा कोणितरी वंद्य गुरु, यती 

भय न यांस काळाचे, सुरहि वंदिती 

याचा शुभ शब्द उद्धरिल जन किती 

जातक शुभ विप्रांनी सकळ वर्तले ।। १ ।।

जमुनी ग्रामवासी करिती कौतुका अती 

बाळाचे तेज बघुनि नयन लोपती 

मानुनि त्या वंद्य, पुरुष मान तुकविती 

त्याचे श्री नरहरी ही नांव ठेविले ।।२।।

बाळ मात्र प्रणव शब्द एक बोलतो 

अन्य सर्व हावभाव करूनी खुणवितो 

आई वदें बाळ मुके काय जाहले ? 

धरुनि लोह कनक करुनी आईस दिले ।।३।।

थाट माट करिती तात मौंजि बंधनी 

दाखवी म्हणुनी वेद मातृ भोजनी 

बोलतो मुका बघुनी सर्व चमकलें 

श्रवुनी शब्द बाळाचे धन्य जाहले ।।४।।

नमुनि म्हणें आईला जाऊदे मला 

तिर्थाटनी, दिक्षार्थी, जन्म घेतला 

सर्व सौख्य तुजलागी आई अर्पिले 

तेंच श्रीसरस्वती नृसिंह जाहले ।। ५ ।।

Click to rate this post!
[Total: 0 Average: 0]